आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Power Supply Discontinuous,latest News In Divya Marathi

खंडित वीजपुरवठ्याने शहरवासीय त्रस्त, तांत्रिक कामे करण्यासाठी अघोषित भारनियमन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकरोड- महावितरणकडून आठवड्यातून एक दिवस तांत्रिक कामे करण्यासाठी टप्प्याटप्प्याने दोन तासांपासून दहा तासांपर्यंत वीजपुरवठा खंडित केला जात आहे. गेल्या काही महिन्यांपासून या अघोषित भारनियमनाचा त्रास ग्राहकांना सहन करावा लागत आहे. शनिवारीही (दिं 11) शहरवासीयांना खंडित वीजपुरवठ्याचा फटका बसला.पावसाळ्यापूर्वी महावितरणकडून देखभाल-दुरुस्तीची कामे केल्यानंतर अवघ्या महिन्याभराच्या अंतराने पुन्हा तांत्रिक कामे केली जात आहेत. वीजपुरवठा खंडित ठेवून मानसिक त्रास दिला जात असल्याची ग्राहकांची तक्रार आहे. तांत्रिक कामांसाठी वीजपुरवठा खंडित राहिल्यानंतर पुन्हा दिवसभरात कुठेतरी यंत्रणेत बिघाडाने तासन् तास पुरवठा खंडित हाेत असल्याने ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
नियमित कामांमुळे बिघाडाच्या प्रमाणात घट
वीजउपकेंद्रासह विद्युत वाहिन्यांची देखभाल-दुरुस्ती, लोंबकळलेल्या तारांचे फिटिंग आदी महत्त्वपूर्ण तांत्रिक कामे वेळच्या वेळी करणे गरजेचे असते. विलंबामुळे मोठा बिघाड होण्याची शक्यता असल्याने आठवड्याला कामे हाती घेतली जातात. नियमित कामांमुळे शहर परिसरात महावितरणच्या यंत्रणेतील बिघाडाचे प्रमाण घटल्याचे जनसंपर्क अधिकारी वैदेही मोरे यांनी सांगितले.
शनिवारी असा बसला फटका...
शनिवारीदिवसभर शहराच्या विविध भागात वीजपुरवठा खंडित झाला. यात देवळाली कॅम्पला नऊ तास, पिंपळगाव, राजेवाडीला अडीच तास, गिरणारे, मखमलाबादला आठ तास, इंदिरानगर, कलानगर, राजीवनगर, वडाळा, पाथर्डी, अंबडगाव, डीजीपीनगर, आनंदनगर, आनंदवली, तिडके कॉलनीत सहा तास, टाकळी फाटा, हॉटेल द्वारका, अशोका मार्ग, डीजीपीनगर, शिवाजीनगरला पाच तास, इच्छामणी लॉन्स परिसर, आम्रपाली, शांती पार्क येथे दोन तास, त्याचप्रमाणे एमआयडीसी डी प्‍लॉट, सातपूर औद्योगिक क्षेत्रात शनिवारी पाच तास वीज खंडित राहिल्याने उद्योजकांना मोठे नुकसान सोसावे लागले.