आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पूरस्थितीतही राहिला सुरळीत वीजपुरवठा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - नाशिक शहर आणि परिसरात गेले दोन दिवस झालेला मुसळधार पाऊस आणि गोदावरी नदीला आलेल्या पुरानंतर पंचवटी परिसरातील वीजपुरवठा अखंडित राहिल्याने नाशिककर नागरिकांनी महावितरण कंपनीचे अाभार मानले आहेत. शनिवार आणि रविवारी सुटीच्या दिवसांची सुटी रद्द करून सतर्क राहून महावितरण कंपनीच्या सर्वच जबाबदार अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आपापले कर्तव्य चोखपणे बजावल्याने पंचवटी भागात वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यास वीज वितरण कंपनीला यश आले.
पावसाळा सुरू झाल्यानंतर वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वारंवार घडतात. यंदा महावितरण कंपनी यास अपवाद ठरली. दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस आणि गोदावरीला आलेल्या पुरानंतरही काही ठिकाणी अपवाद वगळता पंचवटी परिसराचा वीजपुरवठा सुरळीत सुरू होता. महावितरणचे कार्यकारी अभियंता आणि ६५ कर्मचारी सुटीच्या दिवशी मुख्यालयात हजर होते. पंचवटी परिसरात वीजपुरवठा खंडित झाल्याची एक तक्रार आली नाही.

ग्राहकांच्या किरकोळ तक्रारींची तत्काळ दखल घेतली जात असल्याने नागरिकांनी महावितरणचे अाभार मानले. पंचवटी विभागातील सहा सेक्शनमध्ये वीजपुरवठा अखंडित सुरू होता. पावसाळ्यापूर्वी केलेल्या कामांमुळे वीजपुरवठा सुरळीत सुरू होता.अभियंत्यांसह कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या होत्या. कंपनीकडून सतर्कता ठेवल्याने विभागात वीजपुरवठा अखंड सुरू असल्याचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता अरविंद जोंधळे यांनी सांगितले.

नियोजनाचे फलित
^पावसाळ्यापूर्वी सेक्शन अंतर्गत वीजपुरवठा खंडित राहण्यासाठी नियोजन करण्यात आले होते. सुटी रद्द करण्यात आल्या होत्या. वीज वितरण कर्मचाऱ्यांनी चोवीस तास सेवा दिली. ग्राहकांच्या किरकोळ तक्रारी वगळता वीजपुरवठा खंडित होण्याच्या तक्रारी आल्या नाहीत. अरविंदजोंधळे, अति. कार्य. अभियंता, पंचवटी

पुरानंतर वीजपुरवठा सुरळीत
पंचवटी सेक्शनमधील पंचवटी, मार्केट यार्ड, दिंडोरीरोड, तपोवन, आडगाव नाका, मखमलाबाद भागात वीजपुरवठा अखंडित सुरू होता. अभियंता, ६५ कर्मचारी चोवीस तास सतर्क असल्याने वीजपुरवठा सुरळीत सुुरू होता.
बातम्या आणखी आहेत...