आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pre monsoon Works Issue At Nashik, Divya Marathi

पावसाळापूर्व कामे रखडली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - अवकाळी पावसामुळे शहरात ठिकठिकाणी पाणी तुंबल्याचे चित्र असताना मान्सूनपूर्व सफाईचे जवळपास 60 टक्के काम अद्यापही अपूर्ण असल्याची माहिती उघड झाली आहे. 3307 खड्डे तर आठ हजार चेंबरची सफाई बाकी असून, महापालिकेचे अधीक्षक अभियंता सुनील खुने यांनी आठवडाभरात सर्व कामे पूर्ण करण्याचे आदेश अधिकार्‍यांना दिले आहेत.
चार दिवसांपूर्वी शहरात वादळी वार्‍यासह मुसळधार पाऊस झाला. त्यावेळी ठिकठिकाणी शहरात पाणी साचून राहिले होते. वास्तविक लोकसभा निवडणुकीनंतर तातडीने प्रभारी आयुक्तांनी बैठक घेऊन मान्सूनपूर्व कामे पूर्ण करण्याचे आदेश दिले होते; मात्र महापालिका प्रशासनाने त्यास उशिराने सुरुवात केल्यामुळे पावसाचे पाणी रस्त्यावर साचून राहिले होते. शहरात आजघडीला ठिकठिकाणी नवीन रस्त्यांची कामे सुरू असून, त्यात चेंबर्स तसेच नैसर्गिक नालेही दबले गेले आहेत. हे पाण्याचे प्रवाहही मोकळे करण्याच्या सूचना होत्या. प्रत्यक्षात धिम्यागतीने काम सुरू असल्यामुळे आठवडाभरावर आलेल्या पावसाळ्यात नाशिककरांची दाणादाण उडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

अशी आहे स्थिती : 4388 खड्डे असून, त्यापैकी 1061 खड्डय़ांची दुरुस्ती झाली आहे. अद्यापही 3007 खड्डे बुजवणे बाकी आहे. पावसाच्या पाण्यामुळे तयार होणारे छोटे प्रवाह अर्थातच ओहोळांची संख्या 1743 असून, त्यापैकी 581 ओहळ्यांचे प्रवाह साफ केले आहे. अद्यापही 1151 ओहोळांची सफाई बाकी आहे. 8113 चेंबर्सपैकी 5306 चेंबर्सची छिद्रे मोकळी केली आहेत. 2840 चेंबर्स अद्यापही तुंबलेलीच आहे. कॉकपीट चेंबर्सची संख्या 1177 असून, अद्यापही 355 चेंबर्स मोकळे झालेले नाहीत. पावसाळी पाणी साचवण्याची 408 ठिकाणे असून, त्यांची सफाई सुरू आहे.