आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Preity Zinta Donates Cow To Farmers In Nashik News In Marathi

PHOTOS: ग्लॅमरस अॅक्ट्रेस प्रीती झिंटाने व्रत ठेवून केले सवत्स धेनूचे दान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: सिन्नर तालुक्यातल्या निर्‍हाळे गावात गाेदान करताना प्रीती झिंटा. समवेत दानिश मर्चंट, संताेष दराडे ग्रामस्थ.)

नाशिक- बॉलीवूडमधील ग्लॅमरस अॅक्ट्रेस प्रीती झिंटाचे अनोखे रूप सिन्नर तालुक्यातल्या निर्‍हाळेतील शेतकर्‍यांनी अनुभवले. एरव्ही बॉलीवूडच्या चमक धमकमध्ये दिसणार्‍या प्रीतीने चक्क निर्‍हाळे येथील अवर्षणग्रस्त शेतकर्‍यांची भेट घेतली. शास्त्रशुद्ध पूजन करून तीन जणांना सवत्स धेनूचे (दुधाळ गाय-वासरू) दान केले. यावेळी प्रीतीसोबत मित्र आणि चित्रपट व्यावसायिक दानिश मर्चेंट आले होते.

सवत्स धेनूच्या दानासाठी ग्रहणाचा मुहुर्त?
प्रीती झिंटाने सवत्स धेनूचे दान करण्यासाठी 27 एप्रिल ही तारीख दिली होती. मात्र, शनिवारी चंद्रग्रहण असल्याने या दिवशी दान करण्याने पुण्य लाभते, अशी समजूत आहे. त्यामुळे प्रीतीने चंद्रग्रहणाचा तर मुहुर्त साधला नाहीना, अशीही चर्चा रंगली.
प्रसिद्धीपासून दूर
निर्‍हाळे गावात प्रीती झिंटा येणार असल्याची माहिती माेजक्याच मंडळींना शुक्रवारी रात्री देण्यात अाली. सकाळी 10 च्या सुमारास पांढऱ्या रंगाच्या बीएमडब्ल्यू गाडीतून प्रीतीचे गावात अागमन झाले. मात्र, गर्दीत छायाचित्रकार दूरचित्रवाहिन्यांचे कॅमेरे दिसताच त्यांना दूर जाण्याची सूचना करत ही मंडळी निघून गेल्यानंतरच प्रीती गाडीच्या खाली उतरली.
अशी जुळली प्रीती..
निर्‍हाळेचे भूमिपुत्र संताेष दराडे मुंबईत चित्रपट व्यावसायिक दानिश मर्चंट यांच्याकडे नाेकरी करतात. अवर्षणग्रस्त शेतकर्‍यांना मदत करण्याबाबत प्रीतीने इच्छा व्यक्त केल्यावर सिन्नर तालुक्यातील निर्‍हाळे गावचे दराडे अापल्याकडे अाहेत त्यांचे गाव समस्याग्रस्त अाहे अशी माहिती मर्चंट यांनी दिली. प्रीतीने दराडे यांना बाेलावून मदतीचे नियाेजन केले. त्यांच्यामार्फत गेल्या अाठवड्यात 20 जणांना अार्थिक मदत पाठवली.

ठेचा-भाकरी घेतली बांधून
दानिश मर्चंट यांनी दराडे यांच्या घरी नाष्टा करताना ठेचा-भाकरी खाण्याची इच्छा व्यक्त केली हाेती. मात्र, प्रीती झिंटाचा उपवास असल्याने तिने फलाहार केला, तर मर्चंट यांनी ठेचा-भाकरीचा अास्वाद घेतला. या मराठमाेळ्या खाद्यपदार्थाची प्रीतीने माेठ्या उत्सुकतेने चाैकशी केली. उपवास साेडताना सायंकाळी मी नक्की ठेचा-भाकरी अावडीने खाईन, असे म्हणत प्रीतीने ठेचा-भाकरी बांधून घेतली.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, प्रीतीचे सवत्स धेनूचे दान करतानाचे EXCLUSIVE PHOTOS