आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Preliminary Meeting For Sihasth In Nashik Corporation

सिंहस्थाच्या पूर्वतयारीसाठी आज नाशिक मनपात बैठक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - सिंहस्थाची पूर्वतयारी म्हणून महापौर अ‍ॅड. यतिन वाघ यांनी 7 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता महापौर दालनात साधू, संत आणि महंतांची बैठक आयोजित केली आहे. सिंहस्थ दीड वर्षांवर येऊन ठेपल्यानंतरही कोणतीही तयारी सुरू नसल्याने साधू-महंतांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

महापालिकेने सुमारे अडीच हजार कोटींचा सिंहस्थ कृती आराखडा तयार करून जिल्हा प्रशासनाकडे सादर केला. मात्र अद्याप कुठल्याही प्रकारची ठोस कार्यवाही सुरू झालेली नसल्याने दिगंबर आखडा, चतु:संप्रदाय आखाडा यासह विविध आखाड्यांच्या महंतांनी जिल्हा प्रशासन व पालिकेवर नाराजी व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर पालिकेने बैठक घेऊन पूर्वनियोजनासाठी साधू महंतांकडून सूचना मागविल्या आहेत.

तपोवनातील साधुग्रामसाठी राखीव जागा अद्याप ताब्यात न घेतल्याने साधुग्राम उभे कसे करणार असा प्रश्न उपस्थित झाला असून, 54 एकर जागेव्यतिरिक्त कोणतीही जागा अद्याप पालिकेच्या ताब्यात नाही. साधुग्रामसाठी एकूण 300 एकर जागेची आवश्यकता आहे. संबंधित संपूर्ण क्षेत्र नाविकास क्षेत्राखाली असूनही त्याठिकाणी अनेक बांधकामे उभी राहत आहेत. यामुळे ही सर्व बांधकामे रोखून ही जागा कायमस्वरूपी साधुग्रामसाठी आरक्षित करावी, अशी मागणी
साधू-महंतांनी केली आहे.

साधुग्रामसाठी जागा घ्यावी
साधुग्रामसाठी 300 एकर जागेची गरज आहे. मात्र, यासंदर्भात गेल्या तीन सिंहस्थापासून आश्वासनेच दिली जात आहेत. प्रशासन कोणतीही ठोस भूमिका याबाबत घेत नाही. यामुळे आधी जागा ताब्यात घ्यावी.
महंत श्री कृष्णचरणदास महाराज
चतु:संप्रदाय आखाडा, पंचवटी