गेल्या बारा वर्षांपासून प्रलंबित असलेली प्रीपेड ऑटोरिक्षा योजना गेल्या वर्षी मोठा गाजावाजा करत सुरू करण्यात आली. दोनशे रिक्षाचालकांनी योजनेत सहभागी होण्यास संमतीदेखील दिली. मात्र, प्रवाशांना वाजवी दरात हक्काची सुरक्षित वाहतूक सेवा मिळावी, या उद्देशाने नाशिकरोड रेल्वेस्थानक परिसरात सुरू करण्यात आलेल्या या प्रीपेड रिक्षा योजनेचा वाहतूक पोलिस आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या दुर्लक्षामुळे वर्षभराच्या आतच बाेजवारा उडाला आहे. ‘डी. बी. स्टार’ने या प्रीपेड रिक्षा योजनेवर टाकलेला हा प्रकाशझोत...
शहरातल्या रिक्षा व्यवसायाला शिस्त लागावी, प्रवाशांची सुरक्षितता अबाधित राहावी आणि या व्यवसायाला प्रतिष्ठा लाभावी, या उद्देशाने प्रीपेड रिक्षांचा हा बंगलोर पॅटर्न नाशिकमध्ये राबविण्यात आला. विशेष म्हणजे, या सेंटरसाठी २०० रिक्षाचालकांनी नोंदणीही केली होती. मात्र, ‘डी. बी. स्टार’ने केलेल्या पाहणीत प्रीपेड रिक्षासेवेचे तीन तेरा वाजल्याचे समोर आले आहे. नाशिकरोड रेल्वेस्थानकावर दररोज लाखो प्रवाशांची ये-जा होते. त्यांना येथूनच सुरक्षितपणे नियोजित ठिकाणी पोहाेचण्यासाठी प्रीपेड रिक्षाथांब्याची सुविधा वाहतूक पोलिसांनी प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या मदतीने सुरू केली आहे. मात्र, सुरुवातीचे काही दिवस वगळता या सुविधेचा लाभ प्रवाशांना मिळत नसल्याचे दिसून आले आहे. रिक्षावाले मीटरपेक्षा अधिक भाडे आकारत असल्याची तक्रार प्रवाशांनी केली. नाशिकरोड रेल्वेस्थानकावर प्रीपेड रिक्षाथांब्याचे कार्यालय आहे. मात्र, येथे या सुविधेची माहिती देणारा फलक अस्तित्वातच नसल्याने बहुतांश प्रवासी या थांब्याबाबत अनभिज्ञ आहेत. शिवाय, या थांब्याचे कार्यालय सतत बंद राहत असल्याने प्रवाशांची गैरसोय होत असून, रात्रीच्या वेळी इतर रिक्षावाले प्रावशांकडून अतिरिक्त भाडे आकारतात. त्यामुळे प्रवाशांची आर्थिक लूट होत आहे.
यासाठी सुरू झाली सेवा
प्रवाशांनावाजवी दरात सुरक्षित प्रवास करता यावा म्हणून प्रीपेड रिक्षांचा हा बंगलोर पॅटर्न नाशिकमध्ये राबविण्यात आला होता. रिक्षाचालकांकडून अवाजवी शुल्क आकारणी होत असल्याच्या तक्रारी सर्वसामान्यांकडून कायमच होत असतात. रात्री-बेरात्री अवाजवी भाड्यासाठी प्रवाशांची अडवणूकही हाेते. कुंभमेळ्यात परराज्यातून किंवा इतर शहरांतून आलेल्या भाविकांची अशी लूट होऊ नये, यासाठी प्रीपेड रिक्षा सेवा महत्त्वाची ठरेल. मात्र, केंद्रचालकाच्या अनागोंदी कारभारामुळे ही सेवा पूर्णत: कोलमडली आहे.
माहिती फलकच नाही
नाशिकरोडरेल्वेस्थानकावरून असंख्य प्रवाशांची ये-जा होते. त्यांना येथूनच सुरक्षितपणे नियोजित ठिकाणी पोहाेचण्यासाठी प्रीपेड रिक्षाथांब्याची सुविधा वाहतूक पोलिसांनी प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या मदतीने सुरू केली. मात्र, काही दिवसांतच या सुविधेचा लाभ प्रवाशांना मिळाल्याचे दिसून आले. रेल्वेस्थानकावर आणि बाहेरही या सुविधेची माहिती देणारा फलकच नाही. त्यामुळे बाहेरच्या प्रवाशांना प्रीपेड रिक्षा सेवा केंद्र कुठे आहे, हे कळतच नाही.
शेअर-ए-रिक्षाचाही विसर
प्रीपेडसोबतचशेअर-ए-रिक्षाही सुरू हाेणार होती. यात मीटरप्रमाणे दर आकारणार होते. नाशिकसह मालेगाव शहरातील सात मनमाडमधील दोन मार्गांवर या योजनेस मान्यता देण्यात आली होती. मीटर टॅक्सी सेवेसाठी पहिल्या किलोमीटरकरिता २०, त्यानंतर प्रतिकिलोमीटर १६ रुपये आकारले जाणार होते. या शेअर-ए-रिक्षा याेजनेचाही शासनाला विसर पडला आहे.
असे आकारतात भाडे
यायाेजनेंतर्गत प्रीपेड रिक्षामध्ये एकावेळेस एक अथवा तीन प्रवासी एकत्रतरीत्या प्रवास करू शकतात. त्याआधी प्रीपेड रिक्षा याेजनेच्या कार्यालयात नाेंदणी करणे गरजेचे असते. प्रवासासाठी दाेन किलाेमीटरकरिता १३.७५ रुपये याप्रमाणे पैसे आकारले जातात. असे काही प्रीपेड िरक्षाबाबतचे िनयम आहेत.
वादाची किनार...
रेल्वेस्थानकप्रवेशद्वारासमोरच प्रीपेड रिक्षाथांब्याचे कार्यालय असून, तेथेच इतर रिक्षांचाही थांबा आहे. त्यामुळे प्रवासी स्थानकाबाहेर आल्यानंतर अर्थातच प्रीपेड रिक्षाचालक आणि अन्य रिक्षा चालकांमध्येच नेहमीच वाद होत असल्याचे येथील व्यावसायिकांनी सांगितले. यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाल्याने प्रवासी येथून थेट काढता पाय घेतात. त्यामुळे प्रीपेड रिक्षांना फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे बोलले जात आहे.
शुभारंभापूर्वीच झाला होता विरोध
नाशिकरोड रेल्वेस्थानकावरील या प्रीपेड सेंटरला अनेक रिक्षाचालक आणि त्यांच्या युनियनने शुभारंभापूर्वीच विरोध केला होता. प्रीपेड रिक्षांनी वाजवी दरात सेवा पुरवल्याने
आपल्याला प्रवासी िमळणार नाही, या भीतीने हा विरोध झाला होता. मात्र, प्रीपेड रिक्षा केंद्रचालकाच्या दुर्लक्षामुळे इलेक्ट्रॉनिक मीटरसह आरटीओंनी राबवलेल्या इतर योजनांप्रमाणेच प्रीपेड सेंटरची योजनाही बारगळल्याचे समोर आले आहे.
कार्यालय पुन्हा लवकरच सुरू करण्यात येणार
प्रीपेड रिक्षांच्या भाड्यात दरवाढ झाली असून, कार्यालयाच्या नूतनीकरणासाठी नाशिकरोड येथील थांब्याचे कार्यालय बंद करण्यात आले. नूतनीकरणाचे काम पूर्ण होताच कार्यालय लवकरच पुन्हा सुरू करण्यात येईल. - िगरीश मोहिते, प्रीपेड रिक्षा केंद्रचालक, नाशिकरोड रेल्वेस्थानक
जीवन बनसाेड, प्रादेशिकपरिवहन अधिकारी
प्रीपेड रिक्षा योजनेचा वाहतूक पोलिस आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या दुर्लक्षामुळे वर्षभराच्या आतच बाेजवारा उडाला. त्यामुळे शहरातील प्रवाशांच्या खिशाला भुर्दंड बसताे आहे. मात्र, इतर रिक्षाचालकांचे ही याेजना बारगळल्याने फावते आहे.
काय आहे प्रीपेड योजना...
नाशिकरोड रेल्वेस्थानकावर संबंधित संस्थेचा बूथ उभारण्यात आला होता. योजनेत सहभागी झालेल्या रिक्षांची चालकांची इत्थंभूत माहिती त्यात ठेवण्यात आलेली होती. प्रवाशाला दिल्या जाणार्या भाडेपावतीवर रिक्षाक्रमांक, चालकाचे नाव तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक या बूथमध्येच होता. प्रवासी उतरेल तेथे पावतीनुसार शुल्क चालकास देण्याची व्यवस्था योजनेत होती. दिवसा मीटरदराच्या २० टक्के अधिक, तर रात्री २५ टक्के अधिक दर आकारला जाणार होता.
थेट प्रश्न, जीवन बनसाेड, प्रादेशिकपरिवहन अधिकारी
- नाशिकराेड येथील प्रीपेड सेवा थांब्याचे कार्यालय नेहमी बंद असते आणि ही सेवा बंद झाली का?
प्रीपेडरिक्षा सेवा ही प्रवाशंाच्या हितासाठी सुरू करण्यात आली असून, कार्यालय का बंद राहते आहे, याची त्वरित माहिती घेऊ.
- प्रीपेड रिक्षाचालक आणि इतर रिक्षा चलकांमध्ये प्रवासी मिळविण्यासाठी नेहमी वाद हाेत असल्याचे बाेलले जाते, त्याचा परिणाम प्रीपेड सेवेवर झाला आहे का?
प्रवासीमिळविण्यासाठी वाद हाेतात हे खरे आहे, हे टाळण्यासाठी लवकरच प्रीपेड रिक्षाचालक, रिक्षाचालक युनियन पदाधिकारी आणि वाहतूक पाेलिसांची बैठक घेऊन यावर ताेडगा काढू.
- केंद्र चालक गिरीश माेहिते यांच्या दुर्लक्षामुळे ही सेवा बंद झाल्याचे नाशिकराेड रेल्वेस्थानकाबाहेरील अनेक व्यावसायिकांनी सांगितले?
केंद्रचालक गिरीश माेहिते यांना पुन्हा केंद्र चालवण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. हे कार्यालय नेहमीच बंद राहत असेल, तर याची नक्कीच चाैकशी हाेईल.
तत्कालीन पोलिस आयुक्त सरंगल यांच्या हस्ते झाले होते उद्घाटन
प्रवाशांना सुरक्षितता लाभावी म्हणून बंगलोर शहराचा आदर्श घेत नाशिकमध्ये प्रीपेड रिक्षा सेवा सुरू करण्यात आली होती. नाशिकरोड रेल्वेस्थानकावर सुरू झालेल्या पहिल्या सेंटरचे उद्घाटन तत्कालीन पोलिस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांच्या हस्ते करण्यात आले होते. नाशिकरोड रेल्वेस्थानकावर सुरू झालेली प्रीपेड रिक्षा सुरक्षित सेवा देईल, त्यामुळे ती मैलाचा दगड ठरेल, असे आयुक्त सरंगल यांनी या सेवेचा शुभारंभ करताना छातीठोकपणे सांगितले होते. मात्र, अल्पावधीतच या सेवेचा बोजवारा उडल्याचे ‘डी. बी. स्टार’च्या पाहणीत समोर आले आहे. ही सुविधा रेल्वेस्थानकानंतर महामार्ग बसस्थानक, सीबीएस अशा शहरातल्या दहा ठिकाणी टप्प्याटप्प्याने असे केंद्र सुरू करण्याची प्रादेशिक परिवहन कार्यालयाने योजना आखली होती. मात्र, नाशिकरोड रेल्वेस्थानकाचीच ही सुविधा कोलमडल्याने अन्य इतर ठिकाणी ही सुविधा सुरूच करण्यात आली नाही.