नाशिक- शहरात मीटरप्रमाणे रिक्षा सेवा मीटरप्रमाणे सीट शेअर करावे, यासाठी ग्राहक पंचायतीने पुढाकार घेतला आहे. यासाठी ‘रिक्षा सेवा कायदे पाळा’ हे आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनासाठी ‘रिक्षा तक्रार कार्ड’ तयार करण्यात आले आहे.
नुकतीच गांधी जयंतीच्या पार्श्वभूमीवर या आंदोलनास सुरुवात करण्यात आली असून, सीबीएस, शालिमार अशोकस्तंभ येथील 100 प्रवासी ग्राहकांना या कार्डचे वाटप करण्यात आले. गणवेश घालणे, बॅच लावणे, मीटरप्रमाणे भाडे घेणे, तीन सीटपेक्षा जास्त प्रवासी बसविणे हा अनुभव शहरवासीयांना नवीन नाही. याबाबत विचारणा केल्यास अरेरावीदेखील सहन करावी लागते. हे चित्र बदलण्यासाठी नाशिक जिल्हा ग्राहक पंचायतीतर्फे जनजागृती करण्यात येत आहे. ग्राहकांशी सौजन्याने वागता त्यांच्याकडून मनमानी पद्धतीने भाडे अाकारणे, पेट्रोल ऐवजी रॉकेलवर रिक्षा चालविणे असे बदल घडविण्यासाठी आरटीओ पोलिस खाते यांनी दक्ष राहून रिक्षाचालकांवर दंडात्मक कारवाई करावी त्यांचे परवाने रद्द करावे, सर्व रिक्षांना ई-मीटर कॉलिब्रेशन करून बसवावे, पुण्याच्या धर्तीवर नाशिकलाही प्रीपेड रिक्षा सेवा द्यावी,त्यांच्यासाठी स्वतंत्र स्टॅण्ड ठेवावे, तेथे तीन सीटच्या शेअर रिक्षांचे प्रमाणित शेअर भाडे चार्ट लावावा त्याप्रमाणेच भाडे घ्यावे, नाे पार्किंगमध्ये लावण्यात आलेल्या रिक्षांवर दंडात्मक कारवाई करावी, प्रत्येक रिक्षामध्ये वाहक सीटच्या मागे आरटीओने प्रमाणित केलेल्या मीटर भाडे चार्ट लावावा, ज्या भागात अनुचित प्रथांनी रिक्षा चालविल्या जातील, त्या भागातील वाहतूक पोलिसांवर कामात कुचराई केली म्हणून, निलंबन करून शिस्तभंगाची कारवाई करावी या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे.
प्रसंगी उच्च न्यायालयात दाद मागणार
पुढीलवर्षी देशासह विदेशातीलदेखील नागरिक सिंहस्थाच्या निमित्ताने नाशिक शहरात येतील. प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांकडून त्यांची लुटमार झाल्यास शहराची बदनामी होईल. त्यामुळे नागरिकांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींचे सामूहिक निवेदन आम्ही आरटीओ कार्यालयाकडे देणार आहोत. त्यानंतरदेखील जर या तक्रारींची दखल घेतली गेल्यास उच्च न्यायालयात दाद मागण्यात येईल. विलासदेवळे, सचिव,ग्राहक पंचायत