आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संपावर जाण्याची एसटीच्या कर्मचाऱ्यांनी केली तयारी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- एसटीच्या कर्मचाऱ्यांचे पगार इतर महामंडळातील कर्मचाऱ्यांपेक्षा खूपच कमी आहेत. महावितरणप्रमाणे या कर्मचाऱ्यांना २५ टक्के पगारवाढ मिळावी, याकरिता संघटनेच्या माध्यमातून ते १५ मेदरम्यान मिसकॉलद्वारे कर्मचाऱ्यांचे मत जाणून घेण्यात येत आहे. या मागणीसाठी संपावर जाण्याची कर्मचाऱ्यांची तयारी असून, महामंडळाला नोटीस देऊन संप करण्यात येणार असल्याची माहिती इंटकचे अध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांनी दिली.
स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑप. बँकेची निवडणूक २७ मे रोजी होणार आहे. याकरिता क्रांती पॅनलच्या माध्यमातून इंटक संघटना रिंगणात उभी असून, या प्रचार दौऱ्यानिमित्त अकोला विभागामध्ये अकोला आगाराला भेट दिली असता ते बोलत होते. इंटक संघटना कर्मचाऱ्यांच्या समस्या, प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने विविध आंदोलने करून, न्यायालयीन लढाई लढून न्याय देण्यासाठी झटत आहे. पारदर्शी स्वच्छ कारभार, भ्रष्टाचारमुक्त बँक, दहा टक्के व्याजदराने कर्ज पुरवठा, कर्ज वाटपात पारदर्शकता, मयत कर्मचाऱ्यांची कर्जमाफी, परराज्यात कमी व्याजदरात गुंतलेले १५६ कोटी रुपये परत आणणे, जामीनदाराशिवाय कर्ज वाटप योजना, शैक्षणिक कर्ज मर्यादा वाढवणे, गृह कर्ज घेण्याच्या जाचक अटी रद्द करून कर्जाची मर्यादा वाढवण्यासाठी इंटक आगामी काळात पुढाकार घेईल, असेही या वेळी सांगण्यात आले.
याप्रसंगी सरचिटणीस डी. ए. लिपणे पाटील, चंद्रकांत काकडे, साहेबराव घुगे, अनिल गरड, अनंत सानप, एस. आर. पाटकर, दत्ता तिगोटे, रघुनाथ गाडगे, विनायक वडाळ, देवराम इंगळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.