आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • President Of India Increase To Children News In Marathi

राष्ट्रपतींकडून बालकांच्या अभियानाला प्रोत्साहन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - नाशिकरोड परिसरातील कारडा कुटुंबातील तिघा बालकांनी स्वच्छ भारत अभियानाचा प्रचार करण्यासाठी घेतलेल्या पुढाकाराला थेट राष्ट्रपतींकडूनच प्रोत्साहन मिळाले आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी या बालकांना स्वत:चे छायाचित्र असलेले शुभेच्छापत्र पाठविल्याबद्दल बालकांचा आनंद द्विगुणित झाला आहे.
कारडा कुटुंबातील करमचंद कारडा यांनी त्यांच्या नात्यातील दृष्टी, देवेश आणि एकता या तिन्ही बालकांची अभिनव वेशभूषेतील छायाचित्रे काढून त्यांचा अधिकाधिक नागरिकांपर्यंत प्रसार करीत स्वच्छ भारत अभियानाला बळ देण्याचा प्रयत्न केला.

अशीआहेत संदेशपत्रे :एका संदेशपत्रात दृष्टी कारडा ही मुलगी मदर इंडियाच्या पेहरावात भारत स्वच्छ ठेवण्याचे अ ावाहन करीत आहे. तर, देवेश कारडा हादेखील महात्मा गांधी यांच्या वेशभूषेत भारत स्वच्छ ठेवण्याचे आवाहन करीत आहे. हे दोघेही सेंट फिलोमिना शाळेतील दहावीचे विद्यार्थी असूनही त्यांनी या अभियानाला बळ देण्यासाठी हातभार लावला. एकता कारडा या अशोका स्कूलमध्ये दुसऱ्या इयत्तेत शिकणाऱ्या मुलीने शेतकऱ्याच्या वेशभूषेत बैलगाडी हाकत स्वच्छ भारत अभियानाला बळ दिले आहे.

राष्ट्रपतींचे प्रोत्साहन प्रेरणादायी
राष्ट्रपतींनीबालकांच्या संदेशपत्रांना इतक्या त्वरित प्रतिसाद दिल्याने या अभियानाबाबत तेदेखील किती आग्रही आहेत, तेच अधोरेखित झाले. त्यांच्याकडून मिळालेले प्रोत्साहन कारडा कुटुंबालाच प्रेरणादायी आहे. - करमचंदकारडा, संचालक,नटराज कलेक्शन

स्वाक्षरीकृत छायाचित्र
राष्ट्रपतीप्रणव मुखर्जी यांनी या बालकांच्या उपक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी स्वत:च्या स्वाक्षरीने सजलेले छायाचित्र पाठवले आहे. राष्ट्रपतींकडून त्वरित आलेल्या शुभेच्छापत्रामुळे या मुलांचा आनंददेखील वाढला असून, यापुढेही स्वच्छता अभियानात योगदान देण्याचे जाहीर केले आहे.