आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नाएसोच्या अध्यक्षपदी प्रा. रहाळकर अविरोध; कार्यकारिणीसाठी 17ला निवडणूक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- नाशिक एज्युकेशन सोसायटी त्रैवार्षिक निवडणुकीतून माजी उपाध्यक्ष रमेश देशमुख यांनी माघार घेतल्याने विद्यमान अध्यक्ष प्रा. सूर्यकांत रहाळकर यांची अध्यक्षपदी अविरोध निवड झाली आहे. तर उपाध्यक्ष, कार्यवाह आणि कार्यकारिणी मंडळाच्या ११ जागांसाठी २१ उमेदवार रिंगणात आहेत. अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी १२ उमेदवारांनी माघार घेतल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी माधवराव भणगे यांनी दिली. 


‘नाएसो’ची निवडणूक १७ डिसेंबरला होणार आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्यवाह या प्रमुख पदांसह कार्यकारी मंडळ, तसेच शिक्षक, मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक अाणि शिक्षकेतर कर्मचारी प्रतिनिधी अशा विविध पदांसाठी निवडणूक होत आहे. रहाळकर यांच्यासह देशमुख यांनीही अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला होता. अर्ज माघारीच्या अंतिम मुदतीत बुधवारी (दि. २९) देशमुख यांनी माघार घेतल्याने प्रा. रहाळकर यांचा अविरोध निवडीचा मार्ग सुकर झाला. तर उपाध्यक्षच्या दोन पदांसाठी विद्यमान उपाध्यक्ष दिलीप फडके, चंद्रशेखर मोंढे यांच्यासमोर सुहास अष्टपुत्रे, स्नेहमयी भिडे या उमेदवारांचे आव्हान आहे. उपाध्यक्ष पदासाठी अर्ज केलेल्या रमेश देशमुख, हेमंत जानवे, अरुण चव्हाण, वैशाली कुलकर्णी, शुभांगी नांदुर्डीकर, श्रीकृष्ण शिरोडे, रेखा क्षीरसागर यांनी माघार घेतली. तसेच कार्यवाह पदासाठी शिक्षक मंडळाचे अध्यक्ष असलेले राजेंद्र निकम यांची विद्यमान कार्यवाह शशांक मदाने यांच्याशी लढत होणार आहे. कार्यकारी मंडळाच्या पदांसाठी १५ उमेदवार रिंगणात आहेि. त्यात पांडुरंग अकोलकर, सुहास अष्टपुत्रे, वैशाली कुलकर्णी, भास्कर कोठावदे, हेमंत जानवे, सरोजिनी तारापूरकर, विनायक देशपांडे, वीणा नवले, विश्वास बोडके, रतनशेठ भट्टड, स्नेहमयी भिडे, चंद्रशेखर वाड, श्रीकृष्ण शिरोडे, पी. एन. सराफ रेखा क्षीरसागर हे उमेदवारी करत आहेत. तर चार उमेदवारांनी माघार घेतली आहे. 


शिक्षक शिक्षकेतर प्रतिनिधीसाठीही होणार लढत
नाएसोसंस्थेच्या त्रैवार्षिक निवडणुकीत शिक्षक प्रतिनिधींमध्ये पेठे विद्यालय शाळेतील एका पदासाठी शैलेश पोटोळे शशांक मदाने हे उमेदवारी करत आहेत. तसेच सीडीओ मेरी शाळेतील एका पदासाठी दिलीप अहिरे पंढरीनाथ बिरारी हे उमेदवारी करत आहेत. तर शिक्षकेतर कर्मचारी प्रतिनिधीच्या एका पदासाठी पेेठे विद्यालयातील साहेबराव पवार तर रंगुबाई जुन्नरे इंग्लिश मीडियम शाळेतील संजय कुलकर्णी हे उमेदवारी करत आहेत. इतर सर्व शिक्षक प्रतिनिधी, मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक पदांसाठी बिनविरोध निवड झाली आहे. 

बातम्या आणखी आहेत...