आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कुटुंबास सांभाळा, अन्यथा जाईल नोकरी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड- प्रेसमधील मृत कामगारांच्या वारसांना नोकरी देण्याच्या ठरावावर प्रेस महामंडळाच्या संचालक मंडळाने शिक्कामोर्तब केले आहे. या ठरावात नोकरी मिळालेल्या वारसदाराने त्याच्यावर अवलंबून कुटुंबातील व्यक्तीचा सांभाळ केला नाही तर नोकरी काढून घेण्याबरोबरच मृत कामगाराच्या पत्नीने नोकरीसाठी अर्ज केल्यास वयाच्या पात्रतेत शिथिलता व नोकरीसाठी प्रथम प्राधान्य देण्याच्या महत्त्वपूर्ण मुद्याचाही समावेश आहे.

इंडिया सिक्युरिटी प्रेस मजदूर संघाने केलेल्या मृत कामगारांच्या वारसांना नोकरी मिळावी, या मागणीला ‘एसपीएमसीआयएल’च्या देशातील सात युनिटमधील मान्यताप्राप्त संघटनांनी पाठिंबा दर्शविल्यानंतर महामंडळाने नियमावली तयार करून त्यावर शिक्कामोर्तब केल्याचे संघाचे कार्याध्यक्ष जगदीश गोडसे व उपाध्यक्ष माधवराव लहांगे यांनी सांगितले. ही योजना 4 फेब्रुवारी 2013 पासून लागू झाली असून, दरवर्षी रिक्त जागांच्या पाच टक्के वारसांना नोकरीत सामावून घेतले जाणार असले तरी त्यासाठी आयटीआय व पदवीधर असणे बंधनकारक आहे. ज्या युनिटमध्ये जागा रिक्त, तेथेच नोकरी दिली जाणार आहे. वयाच्या 60 व्या वर्षी निधन झाल्यास त्या कामगाराचा वारस नोकरीसाठी अपात्र ठरणार आहे.