आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लष्कराचे साहित्य असल्याचे भासवून मद्याची चाेरटी वाहतूक, नाशिक जिल्ह्यात साडेसदुसष्ट लाखांची विदेशी दारू जप्त

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 मालेगाव  - नाशिक जिल्ह्यातील देवळाली येथील सैनिकांसाठी कपडे व इतर साहित्य घेऊन जात असल्याचे भासवून बेेकायदा मद्यसाठ्याची वाहतूक करणारा कंटेनर राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने  पकडला असून, त्यातून ६७ लाख ४२ हजार ८२०  रुपयांचा विदेशी मद्यसाठा जप्त केला. याप्रकरणी ट्रकचालक सुखविंदर सुवर्णसिंग (रा. अमृतसर) याला अटक करण्यात अाली. ट्रकमधील माल हा केंद्र शासनाच्या सुरक्षा मंत्रालयाच्या कँटीन स्टाेअरचा असल्याची धक्कादायक बाब त्याच्याकडील बिलांवरून समाेर अाली अाहे.
  
मालेगाव तालुक्यातील उमराणे शिवारात मद्यसाठ्याने भरलेला संशयास्पद ट्रक उभा असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्कचे दुय्यम निरीक्षक दिगंबर शेवाळे, एन. अार. गुंजाळ यांना मिळाली हाेती. या माहितीच्या अाधारे शेवाळे व मंुजाळ यांच्या नेतृत्वाखालील पथकाने उमराणे शिवारातील रामदेवजी बाबा मंदिराजवळ असलेल्या यूबी ढाब्याजवळ उभ्या कंटेनरवर (एचअार ६७ ए  १९०५) छापा टाकला. हा कंटेनर सीलबंद हाेता. 

गव्हर्नमेंट अाॅफ इंडिया डिफेन्स मिनिस्ट्री कँटीन स्टाेअर डिपार्टमेंट अलवार राजस्थान येथून सैनिकांसाठी लागणारे कपडे व इतर साहित्य ४३० खाेक्यांमध्ये घेऊन हा ट्रक निघाल्याचे चालकाकडील बिलांवरून स्पष्ट हाेत हाेते. या बिलावर ‘डीजीएम एएसई’ असा शिक्का मारलेला हाेता. परंतु या ट्रकमध्ये दारूच असल्याची पक्की खबर मिळाल्यामुळे पथकाच्या अधिकाऱ्यांनी कंटेनरचे सील साेडून बाॅक्सची तपासणी करण्याचे अादेश दिले. प्रत्यक्ष पाहणी केली असता कंटेनरमधील ७५७ खाेक्यांमध्ये विविध ब्रँडचे भारतीय बनावटीचे विदेशी मद्य सापडले. 
 
 
हे मद्य हिमाचल राज्यात निर्मित व केवळ  हिमाचल राज्यात विक्रीसाठी  तयार करण्यात अालेले तसेच या कंटेनरमध्ये पंजाब राज्यात निर्मित व फक्त पंजाबमध्ये विक्रीसाठी २० खाेके मद्य हाेते. हा मद्यसाठा महाराष्ट्राचा महसूल बुडवून विक्रीच्या उद्देशाने अाणल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी ट्रकचालकाला अटक करण्यात येऊन त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे.  

दाेन महिन्यांतील तिसरी कारवाई   
राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने ३१ डिसेंबरला टाकलेल्या छाप्यात १ काेटी ५ लाख रुपये रकमेचे माल्ट स्पिरिटचे ४० ड्रम जप्त केले. १६ जानेवारीला टाकलेल्या छाप्यात १ काेटीचा मद्यसाठा जप्त केला हाेता. गुरुवारी (दि. २३) ६७ लाखांचा मद्यसाठा जप्त करून दाेन महिन्यांतील तिसरी कारवाई केली अाहे.   
 
६७ लाख ४२ हजार ८२०  रुपयांचा मद्यसाठा जप्त
७५७  खाेक्यांत भारतीय बनावटीचे विदेशी मद्य

लष्कराच्या नावाने बेकायदा वाहतूक 
लष्कराच्या शिक्क्यांचा बेकायदा वापर करून राज्यात मद्यसाठा पाेहोचवण्याचा प्रयत्न झाल्याचा अंदाज अाहे. कुणालाही संशय येऊ नये व चाैकशी करू नये या उद्देशाने पावत्या बनवतानाच कंटेनर सील केल्याचे अाढळून अाल्याने लष्कराच्या नावाने हाेणारी दिशाभूल उघड झाली अाहे.
बातम्या आणखी आहेत...