आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डेंग्यूवर नियंत्रणासाठी आरोग्य विभाग सतर्क, आरोग्य उपसंचालकांची अधिकाऱ्यांना सूचना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाकडून नियोजन सुरू असून, आरोग्य उपसंचालकांनी विभागातील सर्जन आणि आरोग्य अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेत डेंग्यूचा फैलाव रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची सूचना दिली. शहरासह ग्रामीण भागातही डेंग्यूचे रुग्ण वाढत असल्याने विभागाकडून खबरदारी घेण्यात येत आहे.

शहरात डेंग्यूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यास महापालिकेच्या आरोग्य विभागास अपयश आले आहे. जिल्ह्यात डेंग्यूचे रुग्ण वाढले आहेत. आरोग्य विभागाकडून साथीचे आजार रोखण्यासाठी उपाययोजना सुरू आहेत. मात्र, प्रभावीपणे अंमलबजावणी होत नसल्याने रुग्णसंख्या वाढत आहे. आरोग्य उपसंचालकांनी गंभीर दखल घेत नाशिक, जळगाव, धुळे, अहमदनगर, नंदुरबार या जिल्ह्यांचे सिव्हिल सर्जन आणि जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेतली. डेंग्यूचा आजार रोखण्यासाठी खबरदारी घेण्याच्या सूचना उपसंचालक डॉ. बी. डी. पवार यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या.
यादिल्या सूचना : परिसरातस्वच्छता ठेवणे, साथीच्या आजारांच्या रुग्णांची विशेष काळजी घेणे, तापाच्या रुग्णांच्या सर्व चाचण्या करणे, रक्त नमुने तपासणी करणे, स्वच्छता अभियान राबविणे, औषधांचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध ठेवणे.

विभागात डेंग्यूचे २३ रुग्ण
नाशिकविभागात डेंग्यू रुग्णांची संख्या २३ आहे. दोन रुग्णांचा डेंग्यूने मृत्यू झाल्याचे निदान झाले आहे. २१ रुग्णांमध्ये डेंग्यूसदृश लक्षणे आढळली आहेत.
खबरदारी घ्या
डेंग्यूचाप्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाकडून नियोजन सुरू आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी खबरदारी घेण्याकरिता सूचना करण्यात आल्या आहेत. साथीचा रुग्ण आढळल्यास खबरदारी घ्यावी. डॉ.बी. डी. पवार, आरोग्यउपसंचालक, नाशिक विभाग