आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लासलगावमध्येच 1 लाख क्विंटल कांद्याला फटका, शेतकऱ्यांचेच सर्वाधिक आर्थिक नुकसान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लासलगाव - अाडतीच्या मुद्यावरून जुलै अाॅगस्टमध्ये सुमारे तीस दिवस जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमधील कांद्याचे लिलाव बंद राहिले. परिणामी, शेतकऱ्यांनी मेहनतीने पिकविलेला साठविलेला सुमारे ४० टक्के कांदा सडला अाहे. हा खराब कांदा एकाच वेळी बाजारात विक्रीला अाल्याने दर घसरले. कांदा विक्रीची देशातील सर्वात माेठी बाजारपेठ असलेल्या लासलगाव बाजार समितीत गतवर्षी फक्त जुलैमध्येच 1 लाख ६८ हजार ४९६क्विंटल कांद्याचा लिलाव झाला हाेता. यावर्षी फक्त ६० हजार ७१९ क्विंटल इतकाच लिलाव झाला. म्हणजेच फक्त लासलगावमध्येच 1 लाख हजार ७७७ क्विंटल उत्पादनाला या बंदचा फटका बसल्याचे निष्पन्न झाले अाहे. उत्पादक शेतकरीच त्यात सर्वाधिक भरडला गेला अाहे.

‘दिव्य मराठी’ने प्रत्यक्षात शेतकऱ्यांना सध्या मिळत असलेल्या भावामुळे थेट शेतावर जाऊन शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेतल्या. कधी निर्यातबंदी, कधी अाडत, कधी लेव्ही, कधी अवकाळी पाऊस, अवर्षण, अाेला दुष्काळ याचा फटका बसत असल्यामुळे दरवर्षीच कांद्याच्या भावाची कायम वाट लागलेली असते. सरकारने कांद्याला थेट दोन हजार रुपये हमीभाव द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली. कृषिप्रधान देश असूनही अाणि प्रत्येक सरकारने शेती क्षेत्राला प्राधान्य देऊनही कांदा उत्पादकांची ही अवस्था कायम अाहे. सध्याचे केंद्रातील अाणि राज्यातील सरकारही त्याला अपवाद नाही, अशा प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केल्या.

फक्त ४०० रुपये सरासरी भाव : अाॅगस्टमध्ये अाडतीच्या वादानंतर कांदा लिलाव सुरू झाले त्यावेळी सरासरी भाव ७२१ रुपये प्रतिक्विंटल हाेता. त्यातही शेतकरी समाधानी नव्हता, मात्र चाळीतून अाणलेला कांदा फेकण्यापेक्षा विकलेला बरा, असे म्हणत ताे अाजही कांदा निवडून विक्रीकरिता बाजारपेठेत अाणत अाहे. परिणामी, सप्टेंबरमध्ये घाऊक बाजारातील भाव जेमतेम ४०० रुपयांपर्यंत घसरला अाहे. नवीन कांदा दिवाळीनंतरच बाजारात येईल, ताेपर्यंत उत्पादकांना याच भावावर समाधान मानावे लागेल, असेच चित्र अाहे.

चाळीतला पन्नास टक्के कांदा सडलेला :
मेमहिन्यात अालेला कांदा शेतकऱ्यांनी चांगला भाव मिळण्याच्या अाशेने चाळीत साठविला. मात्र, गेल्या महिन्यातील बंदमुळे ताे माल विकता अाल्याने चाळीतच कांद्याला पाणी सुटले. वातावरणातील बदलांमुळे ताे सडला. हा सर्व कांदा फेकण्याची वेळ उत्पादकांवर अाली अाहे. उत्पादन अाणि साठवणूक यांचा सर्व खर्च वाया गेला अाहे.

लाल कांद्यापेक्षा भाजीपाला बरा
कांद्याचेपीक अार्थिकदृष्ट्या धाेका देत असल्याने त्याचे लागवड क्षेत्र घटवून अाता शेतकरी अाता भाजीपाल्याकडे वळत अाहेत. अनेक ठिकाणी अाॅगस्ट-सप्टेंबरमध्ये लाल कांद्याची लागवड झालेली असते. काही उशिरा कांदा लावतात. मात्र, सद्यस्थितीमध्ये भाव घसरल्याचा राेष म्हणून बहुतांश जणांनी भाजीपाल्याची लागवड केल्याचे सांगितले.
लाइव्ह रिपाेर्ट : गतवर्षी ५२५१ रुपये, तर यावर्षी अवघा ३१२ रुपये भाव
हिरामण पालवे(वेळापूर, ता. निफाड) यांनी तर सरळ हिशेबासह व्यथा मांडली. अाॅगस्ट २०१५ मध्ये त्यांनी उन्हाळ कांदा विकला. त्यावेळी त्यांना ५२५१ रुपये भाव मिळाला. या अार्थिक फायद्यामुळे त्यांनी यावर्षी लागवड क्षेत्र वाढवले. त्यामुळे उत्पादन वाढले, पण अाडतीच्या मुद्द्यावर बाजार समित्या ठप्प झाल्याने त्यांना यावर्षी अाॅगस्टमध्ये अवघा ३१२ रुपये प्रतिक्वंटल भाव मिळाला. जवळपास हजार ९३९ रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे त्यांचे नुकसान झाले. जुलै महिन्यात केवळ अाठच दिवस लिलाव झाले. अाॅगस्टच्या ११ तारखेपर्यंत संपूर्ण जिल्हाभरात ते बंद पडले. लिलाव सुरळीत राहिले असते तर कांदा खराबही झाला नसता भावही चांगला मिळाला असता. एकवेळ नैसर्गिक अापत्ती परवडली, पण हे संकट शासनाच्या चुकीच्या धाेरणामुळे अाेढावल्याच्या त्यांच्या विधानाला प्रत्येक शेतकऱ्याने ठामपणे दुजाेरा दिला. त्यामुळे यापुढे कांद्याची लागवड करायची नाही, असा निर्धार त्यांच्या गावातील सर्वच शेतकऱ्यांनी केला अाहे.
बातम्या आणखी आहेत...