आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यात उघडली गेली साडेचार लाखांवर बँक खाती, मात्र 45 दिवसांत व्यवहार झाल्यासच ‘जन-धन’चे लाभ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- केंद्र सरकारने सुरू केलेल्या महत्त्वाकांक्षी ‘पंतप्रधान जन-धन’ योजनेचे निव्वळ खाते उघडण्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र, बहुतांश खात्यांवरून कुठलेही व्यवहार होत नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे खाते उघडल्यानंतर ४५ दिवसांपर्यंत व्यवहार केल्यास विमा योजनेचा इतर लाभ मिळणार नसल्याचे केंद्राने स्पष्ट केलेले आहे.
दरम्यान, याबाबत शहरातील नागरिकांना अजूनही पुरेशी माहिती नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सुमारे दीड लाख गरजू नागरिक विम्यापासून वंचित राहणार असल्याचे चित्र समोर आले आहे. जन-धन योजनेतील खातेदाराचा आकस्मिक मृत्यू झाल्यास त्याच्या परिवाराला एक लाख रुपयांची विमा रक्कम देण्यात येणार असल्याचे बँकांना शासनाने कळविले आहे. इतर सुविधाही देण्यात येणार आहेत. केंद्राने ज्या उद्देशाने ही योजना सुरू केली, तो उद्देश अजूनही सफल होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे केंद्राच्या उद्देशाप्रमाणे पैसा चलनात आलेला नाही. झिरो बॅलन्सची खाती अधिक असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, याचा गैरफायदा घेत काही संघटनांनी नि:शुल्क खाते उघडण्यासाठी प्रति व्यक्ती ५० रुपये अाकारणीही सुरू केल्याचे समोर आले आहे.
प्रशासनाने जनजागृती करावी
यामहत्त्वाकांक्षी योजनेबाबत बँकेसह नागरिकांना माहिती नसल्यामुळे अनेकांनी फक्त खाते उघडून ठेवले आहे. त्यावर कोणीही व्यवहार करीत नाही. त्यामुळे प्रशासनाने या योजनेबाबत जनजागृती करण्याची गरज आहे. कल्पेशकर्वे, नागरिक
..तर मिळणार नाही विम्याचा लाभ
केंद्रसरकारच्या महत्त्वाकांक्षी जन-धन योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला अाहे. आतापर्यंत स्टेट बँकेत पन्नास हजारांहून अधिक खाती उघडण्यात आली आहेत. मात्र, ग्राहकांमधील गैरसमजामुळे त्यावर व्यवहार होत नसल्याची िस्थती अाहे. बहुतांश नागरिकांनी झिरो बॅलन्स खाती उघडली आहेत. खात्यावर ४५ दिवसांच्या आत व्यवहार करणाऱ्या नागरिकांनाच या विम्याचा फायदा मिळणार आहे. बाबूलालबंब, व्यवस्थापक,स्टेट बँक
निम्म्याहून अधिक खाती व्यवहारांविना
जिल्ह्यातआतापर्यंत चार लाख ६६ हजार खाती उघडण्यात आली आहेत. विविध बँकांतील या साडेचार लाखांपैकी निम्याहून अधिक ग्राहकांनी खात्यावर व्यवहार केलेला नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
शहरातील अनेक बँकाही अनभिज्ञ
जन-धनयोजनेंतर्गत खाते उघडणाऱ्या ग्राहकाला एक लाखाच्या अपघात विम्याचे कवच देण्यात आले आहे. मात्र, हा निधी कसा दिला जाईल, याविषयी बँकादेखील अनभिज्ञ आहेत. याव्यतिरिक्त नागरिकांमध्ये या योजनेविषयी वेगवेगळे गैरसमज निर्माण झाले आहेत. त्यामुळे योजनेचा उद्देश नागरिकांपर्यंत पोहाेचत नसल्यामुळे संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.