आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बालमृत्यूची उच्चस्तरीय चौकशी करा, आपच्या प्रीती मेनन-शर्मा यांची मागणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक-  जिल्हा रुग्णालयातील शेकडो बालमृत्यूला कारणीभूत राज्य शासनच असून त्यांनी रुग्णालयातील नवजात बालक कक्षाला लागणाऱ्या सोयीसुविधा पुरविल्यानेच एवढ्या मोठ्या प्रमाणावर बालमृत्यू झाल्याचा आरोप आम आदमी पार्टीच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रीती मेनन-शर्मा यांनी केला. तर रुग्णालयात झालेल्या शेकडो बालमृत्यूंची उच्चस्तरीय चौकशी दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे यावेळी त्यांनी केली. 
 
‘दिव्य मराठी’ने जिल्हा रुग्णालयातील बालमृत्यूच्या घटना उघडकीस आणल्यानंतर अापच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रीती मेनन-शर्मा यांनी याची माहिती घेण्यासाठी जिल्हा रुग्णालयात पाहणी करत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुरेश जगदाळे यांच्याकडून या प्रकरणाची माहिती घेतली. यावेळी आपचे जितेंद्र भावे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. 
 
बातम्या आणखी आहेत...