आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इथे एजंट‌‌ांचीच ‘ऊठ-बस’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उन्हाळ्याच्या सुट्या सुरू झाल्याने शहरातील बसस्थानकांवर प्रवाशांची माेठ्या प्रमाणात गर्दी हाेत अाहे. या गर्दीचा फायदा घेत बसस्थानकावर दलालांचा वावरदेखील माेठ्या प्रमाणावर वाढला अाहे. बसस्थानकबाहेर ट्रॅव्हल्सची वाहने, टॅक्सी, जीप अन्य खासगी वाहने उभी राहतात. या वाहनांचे दलाल थेट बसस्थानकात घुसून प्रवाशांना पळवत असल्याचा प्रकार ‘डी. बी. स्टार’च्या पाहणीत समाेर अाला अाहे. प्रवाशांच्या या पळवापळवीमुळे परिवहन महामंडळाला मात्र माेठा अार्थिक ताेटा सहन करावा लागत अाहे. एवढ्या माेठ्या प्रमाणावर अार्थिक नुकसान हाेत असतानादेखील दलालांच्या या गाेरखधंद्याकडे परिवहन महामंडळाने साेयीस्करपणे दुर्लक्षच केले अाहे. नाशिकराेड बसस्थानकासमोर दररोज शिर्डी, तर ठक्कर बाजार मध्यवर्ती बसस्थनकासमाेर अहमदाबाद, सुरत, काेल्हापूर, पुणे येथे जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स् अन्य वाहने उभे राहतात. या वाहनांचे दलाल प्रवाशांना कमी भाड्याचे अामिष दाखवून घेऊन जातात. सकाळी सात ते नऊ रात्री आठनंतर या खासगी बसचालकांची संख्या जास्त असते. कमी पैशांत प्रवास होत असल्यामुळे प्रवासीही खासगी बसला प्राधान्य देत असून, महामंडळाच्या ताेट्यात भर पडत अाहे.

राजकीय नेत्यांचा वरदहस्त
महामार्गबसस्थानकाबाहेरच माेठ्या संख्यने ट्रॅव्हल्स् अाणि टॅक्सी उभ्या राहतात. या ट्रॅव्हल्स् अाणि टॅक्सीचे एजंट सर्रासपणे प्रवाशांना बसस्थानकाबाहेर घेऊन जातात. यातील बहुसंख्य दलाल राजकीय नेत्याचे कार्यकर्ते असल्याचे येथील एका हाॅटेल चालकाने ‘डी.बी. स्टार’ चमूशी बाेलताना सांगितले. त्यामुळे वाहतूक पाेलिसही या दलालांवर कारवाई करण्यास धजावत नसल्याचेही एका हाॅटेलचालकाने खासगीत सांगितले.

..म्हणूनतर एवढी माेकळीक
नाशिकराेड,ठक्कर बझार अाणि महामार्ग बसस्थानकावर डी.बी. चमूने भेट िदली असता, या तिन्ही स्थानकांवर एजंट सर्रासपणे पुणे.. पुणे.., शिर्डी.. शिर्डी.. असा अवाज देताना दिसून अाले. हा सर्व प्रकार नित्याचाच असून, ताे बसस्थानक नियंत्रकांसमाेर घडताे, हे विशेष. तरीही त्यांच्याकडून या एजंट‌्सना हटविण्यासाठी काेणतेही प्रयत्न हाेत नाहीत. हे जाणून घेण्यासाठी डी.बी. चमूने हाॅटेलचालक, टपरीधारक यांच्याशी चर्चा केली. नियंत्रक अाणि पाेलिसांचे अार्थिक लागेबंध असल्याचे बहुतेक व्यावसायिक सांगत असल्याचे निदर्शनास अाले.

शुक्रवारी सकाळच्या सुमारास एका ट्रॅव्हल्स एजन्सीच्या एजंटने बसमध्ये चढणाऱ्या महिलेला खासगी वाहनाने प्रवास करण्याचा सल्ला दिला. मात्र, महिलेने नकार दिला असता त्याने या महिलेशी अरेरावीची भाषा करीत कित्येक वेळ हुज्जत घातली.

..तर उत्पन्नात वाढ शक्य
शहरातूनजाणाऱ्या-येणाऱ्या तब्बल २५० ट्रॅव्हल्स अाहेत. अहमदाबाद, सुरत, शिर्डी, इंदूर, काेल्हापूर, पुणे मार्गावर त्या धावतात. या ट्रॅव्हल्सच्या एजंट‌्सना बसस्थानकात प्रवेश नसतानाही ते बसस्थानकात येऊन प्रवासी नेतात. परिणामी, उत्पन्न घटते. या दलालांवर नियत्रंण मिळवल्यास एसटीच्या उत्पन्नात नक्कीच वाढ हाऊ शकेल.

असा अाहे नियम
खासगीवाहनांना अाणि त्यांच्या एजंटला अाळा बसावा म्हणून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने बसस्थानकाच्या २०० मीटर परिसरात खासगी प्रवासी वाहतूक करण्यास बंदी असूनही सर्रासपणे खासगी वाहतूक हाेते.

ट्रॅव्हल्सचा पर्याय स्वीकारून शिक्षा...
बसस्थानकातूनप्रवासी पळविल्यानंतर प्रथमत: त्याच्याकडून तिकिटाचे पैसे जमा करून घेतले जातात. त्यानंतर संबंधित प्रवाशाला तासन‌्तास ट्रॅव्हलमध्ये बसवून ठेवले जाते. जाेपर्यंत बसमध्ये पूर्ण प्रवासी हाेत नाहीत ताेपर्यंत ती बस थांबवून ठेवली जाते. पैसे अाधीच भरल्यामुळे प्रवाशाला बस साेडून जाताही येत नाही. रात्री वाजेची बस मध्यरात्री सुटल्याचे अनुभवही असंख्य प्रवाशांना अनेकदा अाले अाहेत. त्याचप्रमाणे या एजंट‌्सला विचारणा केल्यावर अरेरावीची भाषाही वापरली जात असल्याचा अनुभव अनेकांनी सांगितला अाहे.

गजभिये यांनाही अाला हाेता विदारक अनुभव
तत्कालीनविभागीय अायुक्त किशाेर गजभिये यांनाही ट्रॅव्हल एजंट‌्सचा असाच विदारक अनुभव अाला हाेता. ठक्कर बझारमध्ये एका एजंटने त्यांना अापल्या वाहनात बसण्याचा अाग्रह केला. इतक्यावरच ताे थांबला नाही तर त्यांनी गजभिये यांना अक्षरश धक्काबुक्की केली. त्यामुळे संतप्त गजभिये यांनी एसटीच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरलेच, शिवाय त्याची तक्रार राज्य सरकारकडेदेखील केली हाेती. एका उच्च पदस्थ अधिकाऱ्याला अशा अनुभवाला सामाेरे जावे लागले, तर सर्वसामान्य प्रवाशांचे किती हाल हाेत असतील, ही बाब सदर प्रकरणावरून अधाेरेखित हाेते.

कमी दर अाणि एसीचे अामिष
स्थळ: ठक्करबझारची मागील बाजू (एजंट ग्रुपच्या गप्पा सुरू)
वेळ: दुपारी३.३० वाजता.
प्रतिनिधी: भाऊ,पुण्याला जाण्यासाठी येथून किती वाजता बस अाहे?
एजंट: पुण्यालाजाण्यासाठी बस अाहे. मात्र, खूप गर्दी असते, तुम्हाला उभे राहूनच जावे लागेल.
प्रतिनिधी: बरबरं.. ठीक अाहे.
एजंट: अामचीट्रॅव्हल्स अाहे ना, पाच तासात पुण्याला साेडते.
प्रतिनिधी: नकाे,नकाे, मी खासगी वाहनाने प्रवास नाही करत.
एजंट: (प्रतिनिधीचीबॅग बळजबरीने अाेढत) अहाे साहेब, चला तर. साडेतीनशे रुपयांत एसीची पण सुविधा देताे ना.
प्रतिनिधी: नाही,मला एवढे भाडे नाही परवडणार. पुढील महिन्यात फॅमिलीला पुण्याला जायचे अाहे. तेव्हा येऊ तुमच्या ट्रॅव्हल्समध्ये. तुमचे व्हिजीटिंग कार्ड असेल तर द्या, येथे अालाेे की तुम्हाला फाेन करू. अाता जाऊ द्या.
बातम्या आणखी आहेत...