आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासगी सुरक्षा अधिकाऱ्याचे अपहरण, पोलिसांनी पाठलाग करून केली सुटका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - खासगीसुरक्षा एजन्सीच्या एका अधिकाऱ्याला दोन सुरक्षारक्षकांनीच मारहाण करत अपहरण करण्याचा प्रकार शुक्रवारी (दि. २) दुपारी वाजता गडकरी चौकातील एका बँकेच्या एटीएमजवळ घडला. पोलिसांनी काही वेळात संशयितांचा पाठलाग करून टाकळी येथील एका माजी महापौरांच्या बंगल्यातून सुरक्षा एजन्सीच्या अधिकाऱ्याची सुटका केली. संशयितांना पोलिसांनी माजी महापौर दिवे यांच्या टाकळी येथील बंगल्यात ‘खाकी’चा प्रसाद देत बंगल्याची झाडाझडती घेतली.
पोलिसांनी दिलेली माहिती आणि हेमंत पाटील यांच्या फिर्यादीनुसार गडकरी चौकातील एचडीएफसी बँकेच्या एटीएमला मुंबई येथील मार्शल सिक्युरिटी या खासगी सुरक्षारक्षक पुरवणाऱ्या एजन्सीने सुरक्षारक्षकांची नियुक्ती केली आहे. या एटीएमवर संशयित चेतन बनकर, हेमंत बनकर हे दोघे भाऊ सुरक्षारक्षक म्हणून कामास आहेत. दोघेही गणवेश घालत नसल्याने एजन्सीचे क्षेत्रीय अधिकारी हेमंत पाटील यांनी दोघांवर कारवाई केली. या कारवाईचा राग अाल्याने संशयितांनी पाटील यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत दुचाकीवरून अपहरण केले. हा प्रकार मुंबई नाका पोलिसांना समजताच काही वेळात पथक घटनास्थळी दाखल झाले. पथकाने विचारपूस केली असता घटनास्थळावरील संशयितांच्या अाजाेबांचा मोबाइल संशयित घेऊन गेल्याची माहिती मिळाली.उपनिरीक्षक रमेश पवार यांनी आजोबांना स्वत:च्या मोबाइल नंबरवरून संपर्क करण्यास सांगितले. तेव्हा माजी महापौर अशोक दिवे यांच्या टाकळी येथील निवासस्थानी अपहृताला घेऊन गेल्याची माहिती मिळाली. पथकाने क्षणाचा विलंब करता दुचाकीचा पाठलाग सुरू केला. काही वेळात संशयित दिवे यांच्या बंगल्यात पाटील यांना दुसऱ्या मजल्यावर घेऊन जात असतानाच पाेलिसांनी तेथे जात संशयितांच्या ताब्यातून पाटील यांची सुखरूप सुटका केला. दोघा संशयितांच्या या बंगल्यात मुसक्या आवळण्यात अाल्या. क्षणाचा विलंब झाला असता तर मोठा अनर्थ घडला असता. परंतु, पोलिसांच्या समयसूचकतेमुळे गंभीर गुन्हा वेळीच उघडकीस आला. वरिष्ठ निरीक्षक आनंद वाघ, उपनिरीक्षक रमेश पवार, संजय लोंढे, सुहास क्षीरसागर, दीपक रेहरे यांच्या पथकाने ही कारवाई केली. पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंघल यांनी पथकाचे अभिनंदन केले.
संशयितांचीउतरवली झिंग : संशयितबनकर बंधूंना अटक केल्यानंतर पोलिसांनी गडकरी चौकातील एटीएम परिसर टाकळी येथील माजी महापौर अशोक दिवे यांच्या निवासस्थानात नेऊन चांगलीच ‘झिंग’ उतरवली. उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक आयुक्त डॉ. राजू भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली दीडशे पोलिसांच्या ताफ्याने दिवेंच्या बंगल्याच्या आवारात झडती घेतली. यासंदर्भात दिवे यांचाही संशयितांशी काही संबंध आहे का, याबाबत चौकशी करण्यात आली. मुंबई नाका उपनगर पोलिसांनी ही कारवाई केली.

...पोलिसांनी पाठलाग करून केली सुटका
खासगी सुरक्षा अधिकाऱ्याच्या अपहरणकर्त्यांचा पाठलाग करत पाेलिस माजी महापाैर अशाेक दिवे यांच्या बंगल्यावर पाेहाेचले तेथे संशयितांना जेरबंद केले. यावेळी दिवे यांच्याशी चर्चा करताना अधिकारी.
बातम्या आणखी आहेत...