आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेशमूर्ती विक्रीसाठी खासगी जागेचाच पर्याय, पर्वणीमुळे सिव्हिलबाहेर विक्री करण्यास मनाई

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - सिंहस्थपर्वणीमुळे जिल्हा रुग्णालय परिसरात गणपती विक्री करण्यास महापालिकेने पूर्णत: मज्जाव केला असून, ईदगाह मैदानावरदेखील अंतर्गत वाहनतळाची व्यवस्था करण्यात अाली अाहे. महापालिकेच्या अन्य माेकळ्या जागांवर भाविकांसाठी विविध सुविधा देण्यात येणार असल्यामुळे यंदा गणपतीमूर्ती विक्रीच्या गाळ्यांना परवानगीच देण्याचा पवित्रा महापालिका प्रशासनाने घेतला अाहे. अशा परिस्थितीत खासगी गाळ्यांशिवाय मूर्ती विक्रेत्यांसमाेर पर्याय शिल्लक नसल्याचे दिसते.

काही वर्षांपूर्वी दहीपुलाजवळील नेहरू चौकात गणेशमूर्ती विक्रीचे गाळे थाटले जात होते. परंतु, वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याने नेहरू उद्यान येथे गाळे उभारण्यास सुरुवात झाली. तेथेही वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाल्याने जिल्हा रुग्णालयासमोर गाळे उभारले जाऊ लागले. परंतु, रुग्णांना ध्वनिप्रदूषणाचा त्रास होत असल्याने तीन वर्षांपासून या भागात गाळे उभारण्यास परवानगी दिली जात नाही. त्यामुळे माेठा वाद उद््भवताे. तीनही वर्षी वादानंतर िजल्हा रुग्णालयाबाहेर गाळे उभारण्यास नाइलाजास्तव परवानगी देण्यात अाली. यंदा १७ सप्टेंबर राेजी गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात येणार अाहे. त्यापूर्वी १३ सप्टेंबर राेजी सिंहस्थाची पर्वणी अाहे. त्यानंतर १८ सप्टेंबरला नाशिकमध्ये पर्वणी हाेणार अाहे. या काळात दुर्दैवाने एखादी दुर्घटना घडल्यास जिल्हा रुग्णालयाचा रस्ता पूर्णत: माेकळा असायला हवा, या दृष्टीने या परिसरात यंदा गणेशमूर्ती विकण्यास मज्जाव करण्यात अाला अाहे. जिल्हा रुग्णालयाबाहेरच्या जागेला पर्याय हा ईदगाह मैदानाचा असताे. परंतु, या मैदानावर सिंहस्थासाठी वाहनतळाची व्यवस्था केली असल्याने मूर्ती विक्रीसाठी विक्रेत्यांसमाेर खासगी गाळ्यांशिवाय पर्याय उपलब्ध नसल्याचे दिसते.

पालिकेचा सुटकेचा प्रयत्न
पालिकेनेपोलिस आयुक्तांकडे परवानगीचे पत्र धाडून वादातून सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला, तर दुसरीकडे गाळेधारकांचे नेतृत्व करणाऱ्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयासमोर ट्रॅव्हल्स बस पार्किंग केल्या जात असल्याने त्यावर आक्षेप का घेतला जात नाही, असा सवाल करून वादाचा प्रारंभ केला.
परवानगी मिळणे अशक्य

^सिंहस्थपर्वणीमुळे ईदगाह मैदानासह अन्य माेकळ्या जागा विविध सुविधांसाठी राखीव ठेवल्या अाहेत. जिल्हा रुग्णालयाबाहेर मूर्ती विक्रीचे गाळे उभारण्यास पाेलिसांची परवानगी नाही. शिवाय, पर्वणीमुळे या जागेत यंदा परवानगी मिळणे शक्यच नाही. -राेहिदास बहिरम, उपायुक्त, महापालिका