आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेशिस्त ट्रकचालकामुळेच गेला तिघांचा हकनाक बळी, ट्रकचालकावर गुन्हा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडको- पाथर्डी फाटा येथे मुंबई-नाशिक उड्डाणपुलावर सोमवारी रात्री झालेल्या ट्रक कार अपघातात ‘दिव्य मराठी'ची युवा पत्रकार प्रियांका डहाळे हिच्यासह कारचा चालक एक सहप्रवासी अशा तिघांचा मृत्यू झाला. ट्रकचालकाच्या बेशिस्तपणामुळे या तिघांना आपला जीव गमवावा लागला.

खडी भरलेला ट्रक (एमएच १५, डीके ४५७३) विल्होळीकडून नाशिककडे चालला होता. मुंबई-नाशिक उड्डाणपुलावरून जात असताना या ट्रकमधील बारीक कच रस्त्यावर पडत होती. पाथर्डी फाट्यावरील चढ चढताना ट्रकचालक हा रस्त्याच्यामधून चालला होता. ही कच मागील वाहनावर उडत होती. याच वेळी मागून आलेली इंडिगो कारच्या (एमएच ०२, बीक्यू ३२०६) पुढील काचेवर ही कच पडली. रस्त्यावरील पडलेल्या समोरील काचेवर उडालेल्या कचमुळे कार नियंत्रित करणे चालकाला अवघड झाले ही कार ट्रकच्या मागच्या बाजूला जाऊन धडकली. ही धडक इतकी जोरात होती की, कारच्या पुढच्या भागाचा चक्काचूर झाला. यात कारचालक भूपेंद्रसिंग सैनी यांचा जागीच मृत्यू झाला, तर प्रियांका डहाळे यांचा सहप्रवासी मोशीन उल्लाखान याचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला.
या घटनेची माहिती कळताच अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दिनेश बर्डेकर, निरीक्षक डी. डी. इंगोले यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेतली. उड्डाणपुलावर यावेळी झालेल्या बघ्यांच्या गर्दीवर नियंत्रण मिळविले. याबाबत घटनेतील ट्रकचालक सुनीलकुमार समयलाल कोल (२६, रा. मध्य प्रदेश) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आली आहे. या अपघातप्रकरणी पोलिस अधिक तपास करीत आहेत. दरम्यान, अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रियांका डहाळे यांच्या पार्थिवावर मंगळवारी दुपारी नाशिक अमरधाममध्ये शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अनेकांना अश्रू अनावर झाले.
मूळच्या नाशिक येथील प्रियांका डहाळे या स्वत:च्या साखरपुड्यासाठी मुंबईहून सोमवारी (दि. ११) रात्री कूल कॅबने नाशिककडे येत असताना शहरातील पाथर्डी फाटा परिसरात उड्डाणपुलावर कूल कॅब आणि वाळूचा ट्रक यांच्या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. ही बातमी शहरात पसरताच पत्रकारिता, साहित्य सांस्कृतिक क्षेत्राला मोठा धक्का बसला. प्रियांका यांच्या गणेशनगर येथील घरी प्रा. डॉ. वृंदा भार्गवे, नृत्यांगना रेखा नाडगौडा, पत्रकार दीप्ती राऊत, अपर्णा वेलणकर, मेघना ढोके, वैशाली बालाजीवाले, मुक्ता चैतन्य, सई बांदेकर यांच्यासह प्रियांकाच्या मित्रमैत्रिणींनी अंत्यदर्शन घेतले.
प्रियांकाच्या अंत्यसंस्कारावेळी कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे कार्यवाह लोकेश शेवडे, सार्वजनिक वाचनालयाचे उपाध्यक्ष नरेश महाजन, नाट्यगृह सचिव सुरेश गायधनी, ज्येष्ठ रंगकर्मी सदानंद जोशी, लेखक दत्ता पाटील, दिग्दर्शक सचिन शिंदे, महाराष्ट्र टाइम्सचे निवासी संपादक शैलेंद्र तनपुरे, पुणे विद्यापीठातील संज्ञापन पत्रकारिता विभागाचे विश्राम ढोले, श्रीकांत बेणी, विश्वास ठाकूर, कॉम्रेड राजू देसले, नगरसेवक विक्रांत मते, कवी कैलास पगारे यांच्यासह शहरातील सर्व प्रिंट तसेच इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी, साहित्य सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर, कलाकार, लेखक, एचपीटी महाविद्यालयातील पत्रकारिता विभागाचे विद्यार्थी, लाड सोनार समाजबांधव, प्रियांकाचे वडील सुनील डहाळे यांचे सीएट कंपनीतील सहकारी यांच्यासह विविध क्षेत्रांतील नागरिक उपस्थित होते. यावेळी प्रियांका यांच्या पत्रकारिता तसेच साहित्य क्षेत्रातील कार्याच्या आठवणी उपस्थितांनी सांगितल्या.
कमी वयात घेतलेली भरारी आणि असे अर्ध्यातच निघून जाणे म्हणजे तिच्या कुटुंबीयांचीच नव्हे, तर नाशिकच्या पत्रकारिता, साहित्य, सांस्कृतिक क्षेत्राची मोठी हानी झाल्याची प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त करत श्रद्धांजली अर्पण केली. दरम्यान, सोशल मीडियावरही या घटनेने अनेकांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत होती.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, वाहतूक नियंत्रण विभागाच्या कारभारावर उमटले प्रश्नचिन्ह...