आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विविध क्षेत्रामुळे करिअर होतेय ‘ग्लॅमरस’-प्रियंका पटेल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- स्पर्धेच्या युगात करिअरचे असंख्य पर्याय खुले झाले असून, त्या-त्या क्षेत्रातील कौशल्य आत्मसात केल्यास नोकरी व व्यवसायाच्या संधी उपलब्ध होतात. पाश्चात्त्य देशांप्रमाणे आपल्या देशातही फॅशनचे नवनवीन ट्रेंड येऊ लागल्याने ग्लॅमरच्या दुनियेत करिअर करू इच्छिणार्‍यांच्या पदरात यश नक्की पडेल, असा विश्वास व्यक्त करीत आयएनआयएफडीच्या प्रमुख प्रियंका पटेल यांनी विद्यार्थ्यांना फॅशनच्या क्षेत्रातील क्रिएटिव्ह करिअरच्या संधींची माहिती दिली.
विद्यार्थ्यांना नव्या करिअरच्या संधींची माहिती व्हावी, या उद्देशाने ‘दिव्य मराठी’ आणि महेश ट्युटोरिअल्स यांच्या संयुक्त विद्यमाने सिटी सेंटर मॉलमध्ये आयोजित ‘दिव्य एज्युकेशन अँँड करिअर फेअर-2014’ उपक्रमात ‘करिअर ऑप्शन इन फॅशन अँड इंटेरिअर डिझाइन’ या विषयावरील चर्चासत्रात पटेल यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या वेळी मोठय़ा संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. फॅशन व इंटेरिअर डिझायनिंगच्या क्षेत्रातील करिअरच्या संधींची माहिती देताना पटेल यांनी सांगितले की, बॉलीवूड तसेच चित्रपटसृष्टीत फॅशनला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. फॅशनचे नवीन ट्रेंड हे ग्लॅमर प्राप्त करून देत असल्याने या क्षेत्रात करिअरबरोबर सेलिब्रिटीही होता येते.
महत्त्वाच्या टिप्स
करिअर फेअरमध्ये सहभागी शैक्षणिक संस्थांकडून आलेल्या विद्यार्थी व पालकांना करिअरविषयक सखोल मार्गदर्शन केले जात आहे. तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून पाल्याचा कल जाणून घेऊन त्यानुसार योग्य तो सल्ला दिला जातो. प्रवेशप्रक्रिया, नामांकित संस्था, शुल्क, भविष्यातील नोकरीच्या संधी यांबाबत मार्गदर्शन केले जात असल्याने विद्यार्थ्यांना करिअरचा योग्य पर्याय निवडण्यास मदत होत आहे.
भाग्यवंतांना चांदीचे नाणे
‘करिअर फेअर-2014’ला भेट देणार्‍या भाग्यवंतांना दर तासाला चांदीचे एक नाणे देण्यात आले. मिरजकर सराफ अँड जेम्स प्रा. लि. यांच्याकडून हे चांदीचं नाणं देण्यात आलं. दुसर्‍या दिवशी विकास साळुंखे, विशाल खैरनार, दुर्गेश थोरात, सुहास धारणे, शैलेश कुलकर्णी, हेमंत वरसाळे, सागर दाते, देवर्शी बेंद्रे, संजीव कुमार, र्शुती पाटील, विनोद चव्हाण यांना चांदीचे नाणे मिळाले.