आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रबाेधिनी विद्यामंदिरची बालनाट्य स्पर्धेत बाजी, राज्यस्तरीय पातळीवर अपंग विभागातून उत्तेजनार्थ पारितोषिक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे घेण्यात येणाऱ्या बालनाट्य स्पर्धेत यंदा प्रबाेधिनी विद्यामंदिरच्या कलाकारांनी बाजी मारली. या शाळेने सादर केलेल्या ‘शाळा अाजाेबांची’ या नाटकाला अपंग उत्तेजनार्थ पारिताेषिक जाहीर झाले अाहे. 

नांदेड येथील कुसुम नाट्यगृहात पार पडलेल्या १४व्या राज्य बाल नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी पार पडली. या स्पर्धेत अपंग गटासह १२ नाटके सादर झाली. त्यात नाशिकच्या प्रबाेधिनी विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ‘शाळा अाजाेबांची’ या नाटकाला अपंग गटातून उत्तेजनार्थ पारिताेषिक जाहीर झाले अाहे. यासह दिग्दर्शनाचे उत्तेजनार्थ पारिताेषिक कांचन इप्पर, उत्कृष्ट अभिनयासाठी नयन निकम अाणि कांचन पवार यांना राैप्यपदक, तर नवनीत वाघ याला अभिनयासाठी प्रमाणपत्र जाहीर झाले अाहे. 

या स्पर्धेत नाट्य परिषदेच्या तळेगाव दाभाडे शाखेने सादर केलेल्या ‘हॅलाे ब्रदर’ या नाटकाला प्रथम, तर राेहा येथील स्पंदन नाट्यकला क्रीडा, शैक्षणिक मंडळाच्या ‘वाटाड्या अादिमान’ नाटकाला द्वितीय अाणि जळगाव येथील शारदा माध्यमिक विद्यालयाच्या ‘मीनू कुठे गेला’ या नाटकाला तृतीय पारिताेषिक जाहीर झाले अाहे. बालनाट्य संमेलनादरम्यानच या स्पर्धेची अंतिम फेरी घेण्यात आली. यात सादर झालेल्या या नाटकांसाठी परीक्षणाचे काम अरुण भडसावळे, सुरेंद्र केतकर, श्याम शिंदे, संध्या रायते, पूनम चांदाेरकर यांनी बघितले. प्रबाेधिनी विद्यामंदिरच्या या नाटकासाठी धनंजय वाबळे यांचे मार्गदर्शन हाेते. विद्यार्थ्यांना मिळालेल्या या यशाबद्दल शाळेत अानंदाेत्सव साजरा करण्यात अाला.