आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Problam Solved In Space Distribution Of Sadhugram

साधुग्रामच्या जागावाटपाचा तिढा सुटला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- साधुग्राममधीलप्लॉट वाटपावरून मतभेद झाल्यानंतर पूर्णपणे थांबलेली प्रक्रिया शुक्रवारी नियमित सुरू झाली. त्यात साधुग्राममधील ‘सेक्टर-१’, ‘सेक्टर २-अ’ ‘२-ब’चे वाटप सुमारे ९० टक्के झाल्याने ऐन सिंहस्थाच्या प्रारंभीच उद्भवलेला जागावाटपाचा तिढा जवळपास सुटल्याचे स्पष्ट झाले अाहे.

यंदाच्या कुंभमेळ्यात सर्वाधिक चर्चेचा मुद्दा ठरलेला साधुग्रामचा मुद्दा शेवटच्या टप्प्यातही वादातच राहिला. प्रथम शेतकऱ्यांचा विरोध त्यानंतर कसाबसा त्यांच्याकडून ताबा घेतल्यानंतर साधुग्रामची उभारणी झाली. मात्र, त्यातील प्लॉटवरून काही प्रमाणात साधू-महंतांनी नाराजी व्यक्त केली. तीन दिवसांपूर्वी आखाडे-खालसे आणि धार्मिक संस्थांना प्लॉट वाटपास सुरुवात झाली खरी, परंतु साधूंकडूनच पैशाची मागणी केली जात असल्याचा आरोप करण्यात आला. अखेर सारं सुरळीत झालं. दोन दिवस थांबलेली प्लॉट वाटपाची प्रक्रिया शुक्रवारी पुन्हा सुरू झाली. महापालिकेकडे त्याची प्लॉटनिहाय आकडेवारी शनिवारी (दि. ११) सायंकाळपर्यंत मिळण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.