आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्राध्‍यापक संघटनेचा परीक्षांवर बहिष्‍कार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - प्राध्यापकांना शासनाने दिलेल्या लेखी आश्वासनांची त्वरित अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी पुणे विद्यापीठीय व महाविद्यालयीन अध्यापक संघटनेतर्फे (पुक्टो) सोमवारपासून राज्यातील सर्व विद्यापीठीय व महाविद्यालयीन परीक्षेच्या कामावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे औरंगाबाद व नांदेड येथील विद्यापीठांना मात्र या निर्णयापासून वगळण्यात आले आहे.

संघटनेचे अध्यक्ष आर.के.पाटील यांनी रविवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, प्राध्यापकांचे हे आंदोलन 15 जानेवारी 2011 पासूनच सुरू झाले आहे. या आंदोलनातील एक टप्पा म्हणजे सोमवारपासूनचा असहकार आहे. या आंदोलनात महाराष्ट्रभरातील 33 ते 34 हजार प्राध्यापक सहभागी होतील. तसेच आमचे आंदोलन पगारवाढीसाठी नाही. विद्यार्थी व पर्यायाने समाजालाही आमच्या आंदोलनाने नुकसान पोचणार नाही याची दक्षता घेतली आहे. मात्र या आंदोलनामुळे होणा-या नुकसानाला शासनच जबाबदार असेल, असे मतही पाटील यांनी व्यक्त केले.