आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बळीराजाच्या दु:खावर शब्दांची फुंकर, रामदास फुटाणेंसह मान्यवर कवींची खेडगावात मैफल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खेडगाव (नाशिक) - अाले अाले अागलावे, अाले राख इझवाया
अन् राख राख झाली, अाले मढे सजवाया गं माझे माई   
किंवा
या नगरीचे अाम्ही माळी, नरक उरी अामच्या भाळी ,  जीन्याची केली व्हळी रं दादा, जीन्याची केली व्हळी
अशा कवितांमधून सतत दु:खाच्या काठावर असलेल्या बळीराजाच्या शिवारात हास्यधारा फुलवण्याचे, बळीराजाला धीर देण्याचे क्षण मराठी मातीच्या कवींना जेव्हा बळीराजाच्या अंगणात रिते केले तेव्हा त्याच्या करपलेल्या चेहऱ्यावर कधी हास्याची लकेर उमटली अन् कधी काेरड्या डाेळ्यांतूनही काही क्षण का हाेईना अानंदाश्रू बाहेर अाले.
 
कधी त्याच्या मालाला हमीभाव नाही तर कधी अवकाळी पाऊस काळीजच धुवून नेताे, कधी हुंडा नसण्यापायी त्याची लेक जगणंच संपवते तर कधी ताे राेगर घेताे नाहीतर फास तरी अावळताे... हे सगळं थांबलं पाहिजे, बळीराजा जगलाच पाहिजे, ‘जगणं सुंदर अाहे त्यात संघर्ष अाहे’ हे समजून ताे जगलाच पाहिजे अशी फुंकर घालत राज्यातील महत्त्वाचे कवी बळीराजाच्या दाराेदारी काव्यरूपाने अानंदाचं  शब्दसाेनं घेऊन जाणार अाहेत. त्याची सुरुवात नाशिक जिल्ह्याच्या दिंडाेरी तालुक्यातील छाेट्याशा खेडगाव येथे बुधवारी कृषी कवी संमेलनात हास्यधारा या कार्यक्रमाने झाली अाणि त्याला पंचक्राशीतील बळीराजानं मनापासून साद दिली.

कवितेला तळातल्या जनमनात रुजवणाऱ्या ज्येष्ठ कवी, वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांनी राज्याच्या विविध जिल्ह्यांतील, खेड्यांतील अनेक नामवंत कवींची एक यात्राच सुरू केली असून राज्यभरात तब्बल ७५ ठिकाणी हे कवी शेतकऱ्यांच्या दु:खावर अापल्या शब्दांतून फुंकर घालणार अाहेत. त्यापैकीच खेडगाव येथे  पराशरी नदीच्या काठावर कवींची जमलेली मांदियाळी शेतकऱ्याला अापल्या प्रवाहाबराेबर घेऊन जात हाेती. ज्येष्ठ शाहीर संभाजी भगत यांनी अापल्या खणखणीत अावाजाने सुरुवात केली...
बया इकता इकता यांनी इकला हा देस
अन् पालटला भेस कुठ साेधावी मी येस गं... माझे माई
अाले अाले अागलावे अाले राख इझवाया
अन् राख राख झाली अाले मढे सजवाया गं माझे माई
यावर फुटाणे म्हणाले की, शेतकऱ्यांची एकीकडे ही अवस्था तर दुसरीकडे देशाला काेट्यवधींचा गंडा घालणारा लंडनमध्ये पळून जाताे यावर ते मार्मिकपणे म्हणतात की,
जिथे विजय गीत गाती, तिथे बुडतानाही गाती तराणे
असा हा किंगफिशर पुन्हा न हाेणे, पुन्हा न हाेणे...  त्यानंतर भरत दाैंडकर म्हणतात...
तुम्ही मंगळावर जावा, चंद्रावर जावा... तुम्ही पैशांचे पंख लावा
पन् एक मात्र लक्षात ठेवा
उंच उंच उडायला जशी शिकवते माती
खाेल खाेल गाडायला पण तीला नसते कुणाची भीती...
अशा शेतकऱ्यांना धीर देणाऱ्या, त्यांचं दु:ख समजून घेणाऱ्या अशा अनेक कविता सादर हाेत हाेत्या त्यावेळी कधी डाेळ्यांच्या कडा अाेलावत हाेत्या तर कधी हास्याची लकेर उमटत हाेती.
 
परिवर्तनाच्या दिशेने पाऊल : शेतकऱ्यांसाठी सामाजिक भान म्हणून अापलं काहीतरी कर्तव्य अाहे, अापण काही केलं पाहिजे असं वाटत हाेतं. त्यावर सिनेमा- नाटक करण्यापेक्षा थेट त्यांच्यात जाऊन त्यांच दु:ख समजून घेऊन त्यांच्यात हास्यधारा निर्माण करण्याचा अाम्हा कवींचा हा प्रयत्न अाहे. त्यासाठी राज्यभरातील नामवंत कवी एकत्र येत काेणतेही मानधन न घेता राज्यात ७५ कार्यक्रम अाम्ही करणार अाहाेत , असे कवी रामदास फुटाणे यांनी सांगितले.
 
शेतकरी कुटुंबीयांना धीर : खेडगाव येथील केवळ ३४ वर्षांचा शेतकरी माणिक रणदिवे याने अात्महत्या केली. नाशिकसारख्या सुपीक प्रदेशातही शेतकरी अात्महत्या कराताे तर दुष्काळी भागात काय परिस्थिती असेल याचा विचार करून कवी संदीप जगताप, खेडगावचे सरपंच दत्तात्रय पाटील यांच्या पुढाकाराने हा पहिला कार्यक्रम घेण्यात अाला. यावेळी सर्व कवींनी रणदिवे यांच्या घरी जाऊन कुटुंबीयांचे सांत्वन करत धीर दिला. तर खेडगाव ग्रामपालिका अाणि दिंडाेरी बाजार समितीच्या वतीने त्यांना अार्थिक मदतही करण्यात अाली.
बातम्या आणखी आहेत...