आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉ. आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचे उद‌्घाटन, 8 ते 14 एप्रिलदरम्यान सप्ताहाचे आयोजन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शासनाच्या सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ते १४ एप्रिल या कालावधीत सामाजिक समता सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सामाजिक समता सप्ताहाचे उद्घाटन शनिवारी (दि. ८)जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती समाजकल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त प्राची वाजे यांनी दिली.
 
या समता सप्ताहात एप्रिलला सामाजिक न्याय विभागाच्या अखत्यारित असलेल्या विविध मागासवर्गीय महामंडळाच्या लाभार्थ्यांना मार्गदर्शनाचा कार्यक्रम पार पडेल. १० एप्रिलला महाविद्यालये, शाळा, निवासी शाळा, आश्रमशाळा तसेच शासकीय अनुदानित वसतिगृहांमध्ये डॉ. आंबेडकर यांच्या जीवनावरील लघुनाट्य, प्रश्नमंजूषा, वादविवाद स्पर्धा, ११ एप्रिलला जिल्हा शल्यचिकित्सिक यांच्या सहकार्याने आडगाव येथील शासकीय वसतिगृहाच्या परिसरात सामाजिक न्यायभवन परिसरात रक्तदान शिबिर, १२ एप्रिलला अनुसूचित जाती नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांमधून स्वच्छता अभियान, १३ एप्रिलला सामाजिक प्रबोधनात्मक व्याख्यान १४ एप्रिलला सामाजिक समता सप्ताहाचा समारोप सामाजिक न्यायभवन परिसरात होईल.
 
या सामाजिक समता सप्ताहाचे संयोजन आयोजन विशेष अधिकारी देवीदास नांदगावकर, वरिष्ठ समाजकल्याण निरीक्षक एस. बी. त्रिभुवन, समाजकल्याण निरीक्षक समीर क्षत्रिय, एम. एन. गांगुर्डे, व्ही. एस. ताके, एन. आर. नागरे, मधुकर डावरे, ओमेश पवार, एन. व्ही. खांडवी, व्ही. जी. भावसार, मंगेश शेलार करणार आहेत.
बातम्या आणखी आहेत...