आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेमबंधाला वचनांची ग्वाही, प्राॅमिस डेला उत्साह; गिफ्ट‌्स, ग्रीटिंगसह घेतल्या अनेकांनी आणाभाका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- "व्हॅलेंटाइन्सवीक'मधील सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे प्रॉमिस डे. अर्थात आणाभाकांचा दिवस. आयुष्यभर एकमेकांसाठी काहीतरी करण्यासाठी आणाभाका घेण्याचा, वचन देण्याचा, आयुष्यभर एकमेकांचा सांभाळ करण्याची ग्वाही देण्याचा हा दिवस बुधवारी शहरात साजरा झाला. नव-नव्या जोडप्यांसह प्रेमबंधनात अडकलेल्या सर्वांनीच एकमेकांवर आयुष्यभर प्रेम करण्याची आणि प्रेम करणाऱ्यांना सदैव मदत करण्याची वचने घेतली.
"प्रॉमिस डे' साजरा करण्यासाठी प्रत्येकाने आपल्या वेगवेगळ्या संकल्पना वापरल्या. काहींनी खूप दिवसांपासून दडवून ठेवलेल्या आपल्या प्रेमाची ग्वाही "प्रॉमिस डे'च्या निमित्ताने दिली. प्रेमाच्या नात्यातील अतिशय महत्त्वाचा टप्पा एकमेकांसमोर आणाभाका घेत अनेकांनी पार केला. त्यांच्या नात्याला पूर्णत्वास नेण्याची महत्त्वाची कामगिरी वचनांमधून पूर्ण झाली. प्रेमासाठी वाट्टेल ते करण्याची तयारी अनेकांनी दाखवली. रात्री उशिरापासून कॉलेज कॅम्पसपासून आइस्क्रीम पार्लर्सपर्यंत सर्वत्र याचं सेलिब्रेशन सुरू होतं.
व्हॅलेंटाइनदरम्यान असलेल्या लग्नतिथींमध्येही वचनांचा वर्षाव झाला, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. हिंदू विवाह संस्कृतींमध्ये या वचनांना सप्तपदीच्या नावाने ओळखतात. ख्रिश्चन विवाह पद्धतीत यांना वाऊज म्हटलं जातं. तर, मुस्लिम विवाह संस्कारातही प्रेमाची कबुली देऊन "तुला दिलेल्या सगळ्या वचनांची मी पूर्तता करेन' असं महत्त्वाचं वचन या सर्व पद्धतींमध्ये घेतलं जातं. विवाह सोहळ्यात आपल्या प्रेमाची कबुली या पद्धतीने देतानाच, काही नवविवाहितांनी मात्र सरप्राइज प्रपोजलचा फंडा वापरूनही "प्रॉमिस डे' साजरा केला.
सोशल मिडियावरही वचनांची बरसात
केवळग्रिटींग्ज अाणि गिफ्ट‌्स देऊनच नाही तर इंटनेटवरही या डेचा उत्साह दिसून अाला. इंटरनेटच्या माध्यमातून प्रेमाच्या व्यक्तीला आपला संदेश देणं खूप सोपं झालंय. "प्रॉमिस डे'संदर्भातील वेगवेगळ्या इमेजेस, मेसेजेस पाठवुन बुधवारी दिवसभर तरुणाईने अापल्या भावना व्यक्त केल्या. त्यामुळे फेसबूकच्या वॉलपासून ते व्हॉट्सअॅपच्या स्टेटसपर्यंत सर्वत्र वचनांचे बंध दिसून आले.
ख्रिश्चन वाऊज
सर्व परिस्थितीत तुझी काळजी घेईन. तुझ्यावर नेहमी प्रेम करेन.
तुझ्या आरोग्यासाठी मी कायम प्रयत्नशील राहीन.
तुझ्या सुख-दु:खात सहभागी होईन.
तुला कधीही काहीही कमी पडणार नाही, याची मी काळजी घेईन.
मी केलेल्या सगळ्या वचनांची पूर्तता करेन. तुझी आयुष्यभर साथ देण्याचं वचन देतो.
माझ्या प्रत्येक वस्तू, अन्न, संपत्तीचा वापर तुझ्या सहभागाने करेन, प्रत्येक कृतीमध्ये माझ्याइतकाच सहभाग देईन.
दु:खात धैर्याने आणि सुखामध्ये अधिकाराची भावना ठेवता प्रत्येक प्रसंगी सगळ्यांशी मिळून मिसळून, गर्व बाळगता वागेन.
एकमेकांशी एकरूप राहण्यासाठी प्रयत्नशील असेन, सर्वार्थी एकनिष्ठ वागेन.
तुझ्या आनंदासाठी योग्य असणारे प्रत्येक वर्तन आवडीने आणि माझे कर्तव्य समजून करेन.
तुझ्या सुख-दु:खात मी सामील होईन, सर्व प्रयत्नांनी तुझी दु:ख वाटून घेईन.
सामाजिक कार्यात विनाअडथळा, तुझा विरोध करता मी सामील होईन, तुला संपूर्ण सहकार्य करेन.
वरील सर्व सहा वचने मी मनापासून दिली आहेत, ते पूर्ण करण्यासाठी त्यांचे मनोभावे पालन करेन.
मुस्लिम रिवाज
मुस्लिमविवाह पद्धतीत घेतल्या जाणाऱ्या वचनाचं स्वरूप सोपं आणि साधं असतं. समोरच्या व्यक्तीशी आयुष्यभराची गाठ बांधली जात असताना, तिच्या स्वभावातील गुणदोषांसह त्या व्यक्तीला स्वीकारून साथ देण्याची तयारी दोन्ही व्यक्तींची असल्यास, त्यांना कुबुल है.. म्हणून एकमेकांना स्वीकारल्याचं वचन घेतलं जातं. या वचनांची पूर्तता करण्याचं वचन एकमेकांना कुबुल करून घेतलं जातं.