आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मालमत्ता खरेदी-विक्रीवर एलबीटी कायम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - राज्य शासनाने अाॅगस्टपासून राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था (एलबीटी) कर रद्द केला, परंतु, मुद्रांक विभागाला अद्याप याबाबतचे काेणतेही परिपत्रक प्राप्त झाल्याने पूर्वीप्रमाणेच मालमत्ता खरेदी-विक्रीवर एलबीटी अाकारला जात अाहे. परिणामी ग्राहकांमध्ये संभ्रम िनर्माण झाला असून, खरेदी-विक्रीचे व्यवहार थंडावले अाहे.
राज्य शासनाने एक अाॅगस्टपासून ५० काेटींच्या अात उलाढाल असणाऱ्यांना उद्याेगांना एलबीटी रद्द केल्याची घाेषणा केली. मात्र, ५० काेटींच्या वर उलाढाल असणाऱ्या उद्याेगांना एलबीटी भरावाच लागणार अाहे. मालमत्ता खरेदी अथवा विक्री करताना स्टॅम्पड्युटीवर शासनाकडून पाच टक्के कर अाकरला जाताे, तर नाेंदणींसाठी एक टक्का एलबीटी अाकारला जाताे. हा एक टक्का एलबीटी रद्द हाेण्याची अपेक्षा हाेती. मात्र, ताे रद्द झाल्याने सर्वसामान्य ग्राहकांची निराशा झाली असून, घर घेण्याचे स्वप्न हे स्वप्नच राहण्याची शक्यता अाहे.
शासनाने एलबीटी रद्द केल्याची घाेषणा केली असली तरी मुद्रांक विभागाला अद्याप शासनाकडून त्याबाबतचे परिपत्रक प्राप्त झाल्याने प्रत्यक्षात मालमत्ता खरेदी-विक्रीवर सहा टक्के कर अाकारणी सुरूच असल्याचे िदसत अाहे. एलबीटी रद्द हाेणार या अाशेवर अनेकांनी अापले मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहार स्थगित केले हाेते, मात्र अाता एलबीटी रद्द हाेऊनही पूर्वीसारखीच कर अाकारणी हाेत असल्याने ग्राहक खरेदी-विक्रीचे व्यवहार करायचे की, नाही या िद्वधा मनस्थितीत सापडल्याचे दिसत अाहे.

खरेदी-विक्रीचेव्यवहार घटले : राज्यशासनाने २४ जुलैला ५० काेटींच्या अातील उलाढालींवर एलबीटी माफ करण्याची अधिसूचना काढली. २० ते २४ जुलैदरम्यान नाशिकमधील मुद्रांक विभागात ११९ खरेदी विक्रीचे व्यवहार झाले. त्यानंतर २५ ते ३० जुलैला ६८ खरेदी-विक्रीच्या व्यवहारांची नाेंद झाली. ३१ जुलैला प्रत्यक्षात एलबीटी रद्द करण्याचा निर्णय जाहीर करण्यात येऊन अाॅगस्टला एलबीटी रद्द करण्यात अाला. त्यानंतर मात्र मुद्रांक विभागाला एलबीटी रद्दचे काेणतेही परित्रक प्राप्त झाल्याने व्यवहार थंडावले असून ते अाॅगस्टदरम्यान केवल २५ खरेदी-विक्रीचे व्यवहार हाेऊ शकले अाहे.

ग्राहकांचे वेट अॅण्ड वाॅच
राज्यशासनाने एलबीटी अाॅगस्टपासून रद्द केला. त्यामुळे मालमत्ता खरेदी-विक्रीवर अाकारला जाणारा एक टक्का एलबीटी रद्द हाेण्याची शक्यता गृहीत धरून अनेकांनी व्यवहार स्थगित केले हाेते. वरिष्ठ पातळीवरून मुद्रांक विभागाला याबाबत काेणतेही परिपत्रक प्राप्त झाल्याने मालमत्ता व्यवहारावर पूर्वीप्रमाणेच कर अाकारणी सुरू अाहे. त्यामुळे ग्राहकांनी वेट अॅण्ड वाॅचची भूमिका घेतल्याने मुद्रांक कार्यालयात साेमवारी नेहमीपेक्षा कमी वर्दळ पाहायला मिळाली.
स्टॅम्पड्युटीत वाढ शक्य
मालमत्ता खरेदी-विक्रीवरील एक टक्का एलबीटी रद्द हाेण्याची अपेक्षा हाेती. मात्र, मुद्रांक विभागाला अद्याप परिपत्रक प्राप्त झालेलेे नाही. एलबीटी जरी रद्द झाला तरी स्टॅम्प ड्युटी वाढण्याची शक्यता वर्तवली अाहे. त्यामुळे घरे महाग हाेण्याची शक्यता अाहे. जयेशठक्कर, अध्यक्ष, क्रेडाई, नाशिक
सहा टक्के अाकारणी
राज्यशासनाने एलबीटी रद्द केल्याची घाेषणा केली अाहे. मात्र, अाम्हाला अद्याप काेणतेही परिपत्रक प्राप्त झालेले नाही, त्यामुळे मालमत्ता खरेदी-विक्रीवर पूर्वीप्रमाणेच सहा टक्के कर अाकारणी सुरू अाहे. याबाबत ग्राहकांकडून फाेनवरून विचारणा हाेत अाहे. कैलास दवंगे, दुय्यम निबंधक, नाशिक
बातम्या आणखी आहेत...