नाशिक - शहराच्या विकासात व्यावसायिक समुदायाचे महत्त्वाचे याेगदान असून, त्यात बांधकाम व्यावसायिकांचाही प्रामुख्याने समावेश हाेताे. नियम किचकट असले तर त्याचा अर्थही वेगवेगळ्या प्रकारे निघताे संभ्रम निर्माण हाेताे आणि त्यामुळे नियम माेडले जातात. मात्र, अापल्या काळात कायद्यानेच काम हाेईल अापण एकत्रितपणे बांधकाम व्यवसायापुढे असलेले सध्याचे प्रश्न साेडवू, अायुक्त म्हणून तुम्हाला जे सहकार्य पाहिजे ते माझ्याकडून अापणास नक्की मिळेल, अशी ग्वाही महापालिका अायुक्त अभिषेक कृष्णा यांनी बांधकाम व्यावसायिकांना दिली.
स्पाॅट बुकिंग करणाऱ्यांना एलसीडी
^गंगापूरराेड अाणिकाॅलेज राेडप्रमाणेच अत्याधुनिक सुविधा दिंडाेरीराेडवरील स्नेहनगरमधील ‘नवकार नेस्ट’ या गृहप्रकल्पात अाम्ही अगदी रास्तदरात दिल्या अाहेत. भूकंपराेधक तंत्रज्ञानाचा वापर या प्रकल्पात केला गेला असून, १८ लाखांपासून वन बीएचके अाणि २२ लाखांपासून टू बीएचके फ्लॅट उपलब्ध अाहेत. प्रदर्शनात स्पाॅट बुकिंग करणाऱ्यांना ३२ इंची एलसीडी टीव्ही भेट दिला जाणार अाहे. -विजय बेदमुथा, संचालक, नवकार ग्रुप पराग बिल्डकाॅन
बांधकाम व्यावसायिक ग्राहकांमधील दुवा
^नाशिक शहराच्या वेगवेगळ्या विभागात अशा प्रकारचे प्राॅपर्टी एक्स्पाे प्रदर्शन ‘दिव्य मराठी’ घेत असून, त्याला ग्राहकांकडून उत्तम असा प्रतिसाद मिळताे अाहे. या प्रदर्शनात एकाच छताखाली विभाग शहरातील अनेक गृहप्रकल्प ग्राहकांना पाहायला मिळतात. दर, सुविधा यांची तुलना करता येते बांधकाम व्यावसायिकांनाही त्यांचे प्रकल्प सादर करण्यासाठी व्यासपीठ मिळते. हे प्रदर्शन बांधकाम व्यावसायिक ग्राहकांमधील दुवा म्हणावे लागेल. मनाेज टिबरेवाल, संचालक, पार्कसाइड
स्वप्नातील घर शाेधण्याची नामी संधी
नामांकित बांधकाम व्यावसायिकांपी उभारलेले उभारण्यात येत असलेले अाकर्षक गृहप्रकल्प, फ्लॅट्स, बंगलाेज, राे-हाऊसेस, प्लाॅट्स, शेती, शाॅप्स, कार्यालये, वाॅटर प्युरिफायर यांचे शेकडाे पर्याय एक्स्पाेत उपलब्ध अाहेत. यामुळे एकाच छताखाली अापल्या स्वप्नातील घर त्यासाठी लागणाऱ्या गाेष्टी शाेधण्याची ही अनाेखी संधीअाहे. विशेष म्हणजे, काही बांधकाम व्यावसायिकांनी फक्त प्रदर्शन कालावधीपुरत्या अाकर्षक अाॅफर्सही दिल्या असून, हे प्रदर्शन २५ सप्टेंबरपर्यंत सर्वांसाठी माेफत खुले अाहे.
राज्यात पहिलाच ‘झिराे कार्बन हाेम्स’ गृहप्रकल्प
^निसर्गातील पंचमहाभूतेयांच्यावर लक्ष केंद्रीत करून अाम्ही, ‘प्रेमराज इनक्लेव्ह’ हा गृहप्रकल्प नाशिक शहरात साकारत अाहाेत. अशाप्रकारचा वैशिष्ट्यपूर्ण असा हा राज्यातील नाशिकमधील हा पहिलाच झिराे कार्बन हाेम्स’ प्रकल्प अाहे. या प्रकल्पामध्ये साैरऊर्जेचा वापर करून उर्वरित ऊर्जा महावितरणला दिली जाणार असल्याने घरटी ५० युनिटपर्यंतच वीज खर्च हाेईल अशी सुविधा देण्यात अाली अाहे. पिण्याचे शुद्ध अाराेग्यदायी पाणी, पाण्याचा पुनर्वापर करून फुलविलेले गार्डन अाणि कचऱ्याची विल्हेवाट लावणारे वापरण्यात अालेले तंत्रज्ञान तसेच याठिकाणी करण्यात अालेली अत्याधुनिक सुरक्षा व्यवस्था यामुळे हा प्रकल्प वेगळाच ठरणार अाहे. प्रत्येक फ्लॅटला तीन बाजूने माेकळी जागा असेल, त्यामुळे बंगल्याप्रमाणे अनुभव ग्राहकाला मिळेल. -राजेश वर्मा, संचालक, अाेम कन्स्ट्रक्शन अॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर
‘दिव्य मराठी’ने भरविलेल्या, पार्कसाइड प्रस्तुत अहिरराव इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि.चे सहकार्य लाभलेल्या, दिंडाेरी राेडवरील ‘प्राॅपर्टी एक्स्पाे’ प्रदर्शनाचे उद्घाटन महापाैर अशाेक मुर्तडक अाणि महापालिका अायुक्त अभिषेक कृष्णा यांच्या हस्ते झाले, यावेळी कृष्णा बाेलत हाेते. व्यासपीठावर पार्कसाइडचे संचालक मनाेजभाई टिबरेवाल, ‘दिव्य मराठी’ नाशिकचे महाव्यवस्थापक मदनसिंह परदेशी, निवासी संपादक जयप्रकाश पवार हाेते.
यांचेही माेलाचे सहकार्य :
याप्रदर्शना करिता हाॅटेल क्राऊन पॅलेस फूड पार्टनर म्हणून, तर रेडिअाे विश्वास रेडिअाे पार्टनर म्हणून सहकार्य करीत अाहे. प्रदर्शनाला भेट देणाऱ्यांना लकी ड्राॅच्या माध्यमातून भेटवस्तू जिंकण्याची संधी दीप अप्लायन्सेसच्या सहकार्याने उपलब्ध अाहे.
अत्यंत चांगला उपक्रम
हा अत्यंत चांगला उपक्रम असून, बांधकाम व्यावसायिक त्या त्या विभागातील ग्राहकांना जाेडणारा हा महत्त्वाचा दुवा म्हणावा लागेल. शहरात अाज काेणी इमारती बांधायला फारसे उत्सुक नाही. मात्र, खूप चांगले प्रकल्प शहरात सुरू असल्याचे येथे पाहायला िमळत असल्याचे सांगत बांधकाम व्यावसायिकांपुढे अाज अनेक प्रश्न अाहेत. महापालिका बांधकाम व्यावसायिक एकत्रितपणे हे प्रश्न येत्या काळात मार्गी लावतील, असे अभिषेक कृष्णा यांनी सांगितले.
प्रदर्शन गृह खरेदी करणाऱ्यांसाठी उपयुक्त
सुंदरशहराच्या जडणघडणीत बांधकाम व्यावसायिकांचा महत्त्वाचा वाटा असल्याचे महापाैर अशाेक मुर्तडक यांनी यावेेळी सांगितले. बांधकाम व्यावसायिकांच्या विविध अडचणी दूर व्हाव्यात, याकरिता ‘दिव्य मराठी’ने सखाेल प्रयत्न केले असून, त्याचा फायदा घर खरेदी करू इच्छिणाऱ्या नाशिककरांनाच झाला अाहे. एकूणच सगळ्याच वर्गाच्या प्रश्नांना वाचा फाेडण्याचे काम ‘दिव्य मराठी’ करीत अाहे. ग्राहकांना एकाच छताखाली विविध गृहप्रकल्पांचे पर्याय या प्रदर्शनातून उपलब्ध करून िदले जात असून, ग्राहकांना त्याचा फायदा हाेत असल्याचेही ते म्हणाले.
प्रदर्शनाचे स्थळ
साैभाग्य मंगल कार्यालय, रिलायन्स पेट्राेलपंपाजवळ, दिंडाेरीराेड, नाशिक
प्रदर्शनाची तारीख वेळ :
२४ २५ सप्टेंबर दरराेज सकाळी ११ ते रात्री वाजेपर्यंत