आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिअल इस्टेट केव्हाही लाभदायी- अनंत राजेगावकर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- शेअर बाजाराचा निर्देशांक 25 हजारांच्या आसपास पोहोचला असून, सोन्याचे भाव 25 हजारांपर्यंत खाली येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशाही स्थितीत रिअल इस्टेटमधील गुंतवणूक नेहमीच हुकमी असल्याचे सिद्ध झाले असल्याचे प्रतिपादन ‘क्रेडाई’ महाराचे अध्यक्ष अनंत राजेगावकर यांनी केले. ‘क्रेडाई’ नाशिकच्या वतीने डोंगरे वसतिगृह मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या तीनदिवसीय ‘प्रॉपर्टी शो’चे उद्घाटन शुक्रवारी झाले. या प्रसंगी राजेगावकर बोलत होते. व्यासपीठावर नाशिकचे अध्यक्ष जयेश ठक्कर, सेक्रेटरी नरेश कारडा, केंद्रीय मनुष्यबळ विकास महामंडळाचे सदस्य जितुभाई ठक्कर, प्रदर्शन समिती अध्यक्ष उमेश वानखेडे, प्रदीप पटेल, श्याम ताम्हणकर होते.
रिअल इस्टेटमधील गुंतवणुकीविषयी ग्राहकांत जनजागृती करण्याची गरज असून, क्रेडाईच्या सदस्यांनी याकरिता पुढाकार घ्यावा, असे आवाहन राजेगावकर यांनी केले. ‘क्रेडाई’ नाशिकने नेहमीच राज्यातील क्रेडाईच्या इतर शाखांपुढे आदर्श उभा केलेला असून, प्रॉपर्टी प्रदर्शन त्याचे उत्तम उदाहरण असल्याचे सांगत हा ‘नाशिक पॅटर्न’ राज्यभर पोहोचणार असल्याचे राजेगावकर यांनी स्पष्ट केले. यानंतर सप्टेंबर महिन्यात ठाणे येथे याच प्रकारचे प्रदर्शन आयोजित केले जाणार असून, नाशिककरांना गृहखरेदीची एक उत्तम संधी या प्रदर्शनाच्या माध्यमातून उपलब्ध झाल्याचे जयेश ठक्कर या वेळी म्हणाले. उमेश वानखेडे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन सुनील कोतवाल यांनी केले.
कार्यक्रमास क्रेडाईचे माजी अध्यक्ष सुनील भायभंग, अनिल जैन, राजूभाई ठक्कर, ताराचंद गुप्ता, भाविक ठक्कर, प्रसन्ना जायखेडकर, गौरंग ओझा, अमित रोहमारे यांसह बांधकाम व्यावसायिक आणि एचडीएफसीचे प्रादेशिक व्यवस्थापक संदीप कुलकर्णी, स्टेट बँक ऑफ इंडियाचे क्षेत्रीय महाप्रबंधक बाबूलाल बंब, आयसीआयसीआयचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

7.5 लाखांपासून कोट्यवधी किमतीची घरे
प्रॉपर्टी प्रदर्शन खया अर्थाने आगळेवेगळे ठरणार आहे. कारण, यंदाच्या प्रदर्शनात अगदी 7 लाख 50 हजार 728 रुपयांच्या एक हॉल-किचन फ्लॅटपासून ते दीड, दोन कोटींच्या पेंट हाउसपर्यंतच्या घरांचे पर्याय नाशिककरांना उपलब्ध आहेत. शहर व परिसरातील बहुतांश असलेले फ्लॅट, रो -हाउसेस, बंगलोज, लेआउट्स येथे ग्राहकांना खुणावत असून, स्वप्नातील घराचा शोध खया अर्थाने या प्रदर्शनात पूर्ण होऊ शकतो.
गृहकर्ज मिळतेय जागेवरच...
प्रदर्शनात नामांकित चार बॅँकर्सचा सहभाग असल्याने प्रदर्शनास भेट देणा-या ग्राहकांची कागदपत्रे सोबत आणलेली असतील तर जागेवरच किती गृहकर्ज त्या ग्राहकाला मिळू शकते, इथपासून कर्जास तत्त्वत: मान्यताही दिली जाते. स्टेट बँक, आयसीआयसीआय बँक, अ‍ॅक्सिस बँक आणि एचडीएफसी बँक यांनी आकर्षक योजना सादर केल्या आहेत.

एसीचा गारवा अन् मनसोक्त निवड
प्रदर्शनासाठी 22 हजार चौरस फुटांवर जर्मन तंत्रज्ञानाचा वापर करून फायर, वॉटर आणि साउंडप्रूफ पिरॅमिड प्रकारातील डोमची उभारणी करण्यात आली आहे. 360 टनांच्या एसीमुळे येथे येणाया प्रत्येक ग्राहकाला आल्हाददायक वातावरणाची अनुभूती मिळते.