आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

४८ निवासी मिळकतींचा व्यावसायिक वापर उघड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - निवासी वापराची घरपट्टी भरून प्रत्यक्षात व्यावसायिक प्रयाेजनासाठी वापर करणाऱ्या ४८ मालमत्ता महापालिकेच्या प्राथमिक सर्वेक्षणात उघड झाल्या असून, संपूर्ण शहरात अाता याच पद्धतीने मिळकत सर्वेक्षणाद्वारे घरपट्टी चाेरी करणाऱ्यांचा शाेध घेतला जाणार अाहे.
गेल्या सहा ते सात वर्षांपासून नाशिक शहरात घरपट्टी चाेरीचा मुद्दा गाजत अाहे. महापालिकेचे उत्पन्न कमी असल्यामुळे घरपट्टी चाेरी राेखून वाढीसाठी प्रयत्न करण्याची मागणी नगरसेवकांनी केली हाेती. माजी विराेधी पक्षनेता सुधाकर बडगुजर यांनी घरपट्टी चाेरीचे पुरावेच सादर करून माेठ्या हाॅटेल्सकडून महापालिकेच्या साथीने हाेणाऱ्या चालबाजीवर प्रकाश टाकला हाेता.

महापालिकेचे तत्कालीन अायुक्त डाॅ. प्रवीण गेडाम यांनी पदभार स्वीकारल्यानंतर घेतलेल्या अाढाव्यात शहरात जवळपास एक लाख मिळकतींची महापालिकेच्या रेकॉर्डवर नाेंद नसल्याचा संशय व्यक्त केला हाेता. शहरातील सर्व मिळकतींचे सर्वेक्षण करून वाढीव क्षेत्रानुसार घरपट्टी अाकारणे, निवासी वापराच्या मिळकतीचा व्यावसायिक वापर करणाऱ्या अास्थापनांकडून व्यावसायिक दराची घरपट्टी मिळवणे यासाठी सर्वेक्षण करण्याचे ठरले. प्रत्यक्षात गेडाम यांच्या कारकीर्दीत मिळकत सर्वेक्षणाचा प्रस्ताव मार्गी लागला नाही.

सद्य स्थितीत निविदा निश्चित झाली असून, सर्वेक्षणासाठी अधिक दर असल्यामुळे या प्रकरणाचे घाेंगडे भिजत पडले अाहे. या पार्श्वभूमीवर किमान माेक्याच्या ठिकाणी निवासी वापराचा व्यावसायिक कारणास्तव किती प्रमाणात गैरवापर हाेताे, याची तपासणी करण्यासाठी अाठवडाभरापूर्वी गंगापूरराेड, काॅलेजराेड, कॅनडा काॅर्नर, अशाेक स्तंभ, गाेळे काॅलनी भागातील १०७८ मिळकतींचे सर्वेक्षण करण्यात अाले. त्यापैकी ४८ मिळकतींत घरगुती वापराची घरपट्टी भरली जात असताना व्यावसायिक वापर हाेत असल्याचे उघड झाले. सर्वेक्षणातील मिळकतीच्या पाच टक्के गैरवापर सुरू असल्याचे उघड झाले.

सर्वेक्षणाबाबत प्रश्नचिन्ह
मुळात महापालिकेच्या समाेरील मिळकतीचा विचार केला तर माेठ्या प्रमाणात घरगुती वापराच्या इमारतीत व्यावसायिक वापर हाेत असल्याचे बाेलले जाते. जुना गंगापूर नाका परिसरातही माेठ्या प्रमाणात काही बंगले, जुन्या इमारतींत व्यावसायिक, कंपन्यांनी बस्तान जमवले अाहे. अशाेक स्तंभ परिसरातही जुन्या इमारतींत असा व्यवसाय करणाऱ्यांची संख्या माेठी अाहे. त्यामुळे डाेंगर पाेखरून उंदीर अशीच अवस्था या सर्वेक्षणात दिसत अाहे.
बातम्या आणखी आहेत...