आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'नाशिकमार्गे राजधानी एक्सप्रेस'साठी रेल्वे मंत्र्यांना तपशील सादर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिल्ली येथे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची मुख्यमंत्री आणि हेमंत गोडसे यांनी भेट घेतली.
नाशिकरोड - नाशिकमार्गे अथवा नाशिक येथून राजधानी एक्सप्रेस सुरू करण्याच्या दोन महिन्यांपूर्वी रेल्वे मंत्रालयाला सादर केलेल्या प्रस्तावावर बुधवारी (दि. ४) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खासदार हेमंत गोडसे यांची चर्चा झाली. गाडी सुटण्याची वेळ, थांबे यासह इतर आवश्यक माहिती त्यांना देण्यात आली. रेल्वेमंत्र्यांनी सर्व पर्याय पडताळून बघणार असल्याचे सांगितले.

स्मार्ट सिटी होण्याच्या दिशेने नाशिकची वाटचाल सुरू असल्याने राज्याच्या राजधानीपासून देशाच्या राजधानीपर्यंत धावणाऱ्या राजधानीचा प्रवास विमान सेवेप्रमाणे वेळेची बचत करणारा आरामदायी असल्याने उद्योजक, व्यावसायिकांसह राजकारण्यांकडून या गाडीला प्राधान्य दिले जाते. उत्तर महाराष्ट्रातून दिल्लीला जाणाऱ्या व्यावसायिक, उद्योजक, सर्वसामान्यांना मुंबईहून दिल्लीचा प्रवास करावा लागत असल्याने स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या नाशिक येथून राजधानी सुरू करावी. यामुळे २४ तासांपेक्षा अधिक प्रवास करावा लागणाऱ्या प्रवाशांच्या वेळेची बचत होणार असल्याचे खासदार हेमंत गोडसे यांनी दोन महिन्यांपूर्वी रेल्वे मंत्रालयाला सादर केलेल्या प्रस्तावात म्हटले होते. बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार हेमंत गोडसे यांनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेऊन राजधानी एक्स्प्रेसच्या प्रस्तावावर सविस्तर चर्चा केली. राजधानीमुळे रेल्वेला मोठा महसूल मिळेल. तसेच महाराष्ट्र, मध्य प्रदेश उत्तर प्रदेश अशी तीन राज्ये एकमेकांना जोडली जातील, या तिन्ही राज्यांतून दिल्लीसाठी जलद गाडी नसल्याचे रेल्वे मंत्र्यांना सांगितले. सध्या धावणारी राजधानी मध्य रेल्वे मार्गावरील प्रवाशांना उपयोगी नसल्याचे रेल्वेमंत्र्यांना पटवून दिल्यानंतर रेल्वेमंत्र्यांनी सर्व पर्याय पडताळून बघितले जातील, असे याप्रसंगी सांगितले.

सकारात्मक निर्णयाची अपेक्षा
नाशिकरोडच्या चौथा प्लॅटफॉर्मवरून अथवा मुंबई सीएसटीवरून २३.०० वाजता राजधानी सुटून नवी दिल्लीला २१.३० वाजता पोहचावी, नाशिक, भुसावळ, भोपाळ, झाशी आग्रा थांबे असावे, यांसह गाडीला कोच, स्पीड यासह इतर माहितीचा आराखडा रेल्वे मंत्र्यांना दिला. प्रस्तावावर सकारात्मक निर्णयाची अपेक्षा व्यक्त केली. हेमंत गोडसे, खासदार
बातम्या आणखी आहेत...