आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दारू दुकान बंद करण्यासाठी पंचवटीकरांची गांधीगिरी, उपोषण अांदाेलनाची मागितली परवानगी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंचवटी - दिंडोरीरोडवरील किस्मत वाइन शॉप बंद करण्यासाठी दिंडोरीरोड आणि पंचवटी परिसरातील नागरिक उपोषणाला बसणार आहेत. उपोषण आंदोलनास कायदेशीर परवानगी मिळण्यासाठी प्रभाग च्या नगरसेवकांसह नागरिकांनी पंचवटी पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकांना निवेदन देत रीतसर परवानगी मागितली अाहे. 
 
बंद झालेले हे दुकान पुन्हा सुरू झाल्याने लोकसहकारनगर परिसरात नागरिकांना असुरक्षित वाटत आहे. दुकान सुरू झाल्याने परिसरातील महिला-युवतींच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. महिलांना रात्रीच्या वेळी रस्त्यावरून जाताना भीती वाटते. वाइन शॉपच्या बाहेरच हाणामारी, भांडणे होतात. यामध्ये गंभीर प्रकारही घडले आहेत. परिसरात लुटमारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. दुकान बंद झाल्यानंतर परिसरात शांतता होती. मात्र, ते पुन्हा सुरू झाल्याने पुन्हा असुरक्षिततेची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. 
 
हे दुकान बंद करण्यासाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचा पवित्रा परिसरातील नागरिकांनी घेत उपोषणाचा मार्ग निवडला आहे. यासंदर्भात नगरसेवक जगदीश पाटील यांच्यासह परिसरातील नागरिकांनी पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दिनेश बर्डेकर यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देत उपोषणाची परवानगी मागितली आहे. 
नगरसेवकांसह नागरिकांनी पंचवटी पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकांकडे निवेदनाद्वारे अांदाेलनाची परवानगी मागितली.

नागरिकांत असुरक्षितता 
दिंडोरीरोड परिसरात मद्य दुकान पुन्हा सुुरू झाल्याने नागरिकांमध्ये असुरक्षितता वाढली आहे. महिलांना रस्त्याने जाताना भीती वाटते. याकरीता उपोषणाची परवानगी मागितली आहे. 
- जगदीश पाटील, नगरसेवक 
बातम्या आणखी आहेत...