आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरपंच व ग्रामसेवकास 3 तास कोंडून ठेवले, पाण्‍यासाठी ग्रामस्‍थांचे आक्रमक आंदोलन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- वारंवार मागणी करूनही पाणी टंचाईवर तोडगा निघत नसल्याने संतप्त ग्रामस्थानी सटाणा तालुक्यातील आखतवाडे येथील ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा काढून सरपंच व ग्रामसेवकास ग्रामपंचायत कार्यालयात तब्बल ३ तास कोंडून ठेवले.

सटाणा तालुक्यातील आखतवाडे येथील नागरिक भर पावसाळ्यात तीव्र पाणीटंचाईचा सामना करीत आहेत, वारंवार मागणी करूनही टॅकर उपलब्ध होत नसल्याने ग्रामस्थाना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. 
 
आखतवाडे ग्रामस्थ उन्हाळ्यापासून टॅकरची मागणी करीत आहेत. याबाबत शासनस्तरावर अनेकदा प्रस्तावही पाठविण्यात आले आहेत. मात्र शासकीय अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याने ग्रामस्थ नाराज आहेत. शासनाने या समस्येची गंभीर दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
 
बातम्या आणखी आहेत...