आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसटी कर्मचाऱ्यांचा आज मध्यरात्रीपासून चक्का जाम, सणासुदीत प्रवाशांच्या अडचणी वाढणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटीच्या कर्मचाऱ्यांनाही वेतनश्रेणी, भत्ते, सेवा-सवलतीसह पदनिहाय सातवा वेतन आयोग लागू करावा, आदी मागण्यांसाठी मान्यताप्राप्त संघटनेने १६ ऑक्टोबर मध्यरात्रीपासून संप पुकारला आहे.
 
यामुळे सणासुदीत प्रवाशांच्या अडचणी वाढणार आहेत. संपात सहभागी न होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने पोलिस बंदोबस्तात बस सोडण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. संघटनेसोबत चर्चेनंतर एसटीने ७ वा वेतन आयोग लागू करता येणार नाही असे लेखी दिले आहे. एसटी कामगार सेनेने संपाला विरोध दर्शविला आहे. दरम्यान, परिवहन मंत्री दिवाकर रावतेंनी संप मागे घेण्याचे आवाहन केले. गेल्या शुक्रवारी एसटीने १ लाख कर्मचाऱ्यांना ११% डीएसह २५०० रुपये व अधिकाऱ्यांना ५ हजार रुपये बोनस देण्याची घोषणा केली होती.
बातम्या आणखी आहेत...