आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोदींच्या पुतळ्याचे दहन; ३० मे रोजी मोर्चा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सातपूर- कामगार शेतकरी विरोधी धोरणाच्या निषेधार्थ सीटूतर्फे जिल्ह्यात विविध ठिकाणी मोदी सरकारच्या पुतळ्याचे दहन करून निषेध करण्यात आला. भूसंपादन कायदा कामगार कायद्यातील बदल मागे घेण्याची मागणी करतानाच येत्या ३० मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट माेर्चा काढण्यात येणार आहे.
मोदी सरकार फक्त कॉर्पोरेट बड्या भांडवलदारांसाठीच काम करीत आहे. शेतकरी कामगारांवर वरवंटा फिरवीत आहे. त्यामुळे या वर्गाला अच्छे दिन ऐवजी बुरे दिन अनुभवाला येत आहेत. या परिस्थितीविरोधात सीटूने मेपासूनच कामगार वर्गात जनतेत जनजागृती केली सोमवारी सार्वत्रिक निषेध करण्यात आला. सातपूर औद्योगिक वसाहतीतील आनंद आय पॉवर, टीडीके इप्कास, प्रीमियम टूल्स, ट्रायकॉम, गोल्डी इंजिनिअरिंग, सुपर कोलॅप्सिबल टूल्स, युनायटेड इंजिनिअरिंग, सुयोग रबर, सिंग इंजिनिअरिंग, सिमेघ इंडस्ट्रीज, एमजी इंडस्ट्रीज, सोमेश फोर्जिंग, क्लासिक फूड्स सिपा इंजिनिअरिंग, मिडवेज डाय वर्क्स; तर अंबडमधील हिंदुस्थान कोकाकोला, अल्फा इंजिनिअरिंग, कॅपिटल फूड्स; स्पायसेस, लिग्रांड, सुमो अॅटोटेक, अॅटोकॉर्प, वैष्णवी अॅटो, ओके टूल्स इत्यादी कंपन्यांच्या गेटवर मोदी सरकारच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी डॉ. डी. एल. कराड, आर. एस. पांडे, सीताराम ठोबंरे, अॅड. वसुधा कराड, श्रीधर देशपांडे, सचिन भोर, देविदास आडोळे, कल्पना शिंदे, संतोष काकडे, तुकाराम सोनजे, अशोक लहाने आदी पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

भोर यांच्यावर गुन्हा दाखल
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने अंबड एमआयडीसीतील अल्फा इंजिनिअरिंग या कंपनीच्या समोर नगरसेवक सचिन भोर यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. शहर पोलिस आयुक्तालय हद्दीतील कायद्याचे उल्लंघन केल्याबाबत नगरसेवक भोर यांच्यासह १५ ते २० आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास अंबड पोलिस करीत आहेत.
बातम्या आणखी आहेत...