आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जुलूस-ए-रझाच्या मिरवणुकीत ‘इसिस’चा तीव्र शब्दांत निषेध

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- सुन्नी पंथीयांचे प्रमुख धर्मगुरू संत हुजूर आला हजरत इमाम अहमद रझा खान फाजीले बरेलवी यांच्या उर्सनिमित्त मंगळवारी (दि. ८) शहरात विविध धार्मिक कार्यक्रमांसह जुने नाशिक परिसरातील वाकडी बारव, चाैक मंडई येथून धार्मिक जुलूस (मिरवणूक) निघाली. दरम्यान, मिरवणुकीत सहभागी मुस्लिम बांधवांनी इसिस या दहशतवादी संघटनेचा तीव्र निषेध करण्यात आला. देशाची प्रगती शांततेसाठी विशेष दुआ पठण करण्यात आले.
चाैक मंडई येथून सुरू झालेल्या मिरवणुकीच्या प्रारंभी मौलाना मुफ्ती सय्यद रिझवान यांनी आला हजरत यांच्या जीवनावर प्रवचन केले. इस्लामचे नाव घेऊन इसिससारख्या दहशतवादी गटांकडून सुरू असलेल्या हल्ल्यांचा तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला. वाकडी बारव, चाैक मंडई येथून खलिफा-ए- शेखे आझम शहर-ए-खतीब हाफीज हिसामोद्दीन साहब खतीब, शहर-ए-काझी मोइजोद्दीन काझी साहब, मुफ्ती महेबूब आलम यांच्या नेतृत्वाखाली मिरवणूक निघाली. बागवानपुरा, कथडा, नाईकवडीपुरा, आझाद चौक, काझीपुरा, मुलतानपुरा, काेकणीपुरा, ईमाम अहमद रझा चौक, खडकाळी, दूधबाजार मार्गे बडी दर्गाह येथे फातेहा पठण करून सांगता झाली. यावेळी हजरत मौ. हाफीज जब्बार, मौ. मुफ्ती सय्यद रिजवान रिफाई शाफाई, मौ. अमजद रझा, मौ. कारी रईस, सय्यद मीर मुख्तार अशरफी, हाजी सादीक शेख, हाजी तौसीफ शेख यांच्यासह मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.

घोषणा, निषेधाचे फलक अन् तीव्र भावना
मुस्लिमबांधवांचे धर्मगुरू हुजूर आला हजरत फाजील-ए-बरेलवी यांच्या जुलूस-ए-रझानिमित्त जुन्या नाशिक परिसरातून काढण्यात आलेल्या मिरवणुकीत मुस्लिम बांधवांकडून इसिस या दहशतवादी संघटनेच्या विरोधात निषेधाचे विविध फलक तयार करण्यात आले होते. यात ‘आय अॅम मुस्लिम, आय हेट इसिस’, ‘वहाबी दहशतवादी मुर्दाबाद’, ‘इसिस आैर इस्लाम का कोई संबंध नहीं’ अशा निषेधाच्या विविध घोषणांचे फलक हातात धरून उंचावण्यात आले होते.