आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राज्यराणी नांदेडपर्यंत नेण्याच्या प्रस्तावास नाशिकमधून विरोध; प्रवासी संघटना अाक्रमक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड- मनमाड-मुंबई असलेली तपोवन एक्स्प्रेसला नांदेडपर्यंत, नाशिक-पुणे असलेली एक्स्प्रेस कालांतराने मनमाडपर्यंत त्यानंतर थेट भुसावळपर्यंत करण्यात आली. आता राज्यराणी एक्स्प्रेससुद्धा नांदेडपर्यंत वाढविण्याचा घाट मध्य-दक्षिण रेल्वे घालत आहे. मात्र, हा प्रस्ताव कदापिही मान्य होऊ देणार नसल्याचे राज्यराणी प्रवासी संघटना आणि रेल्वे सल्लागार समितीच्या वतीने घेण्यात आला आहे. राज्यराणी एक्स्प्रेस नांदेडपर्यंत सुरू केली तर मनमाड आणि नाशिकच्या प्रवाशांवर अन्याय होणार आहे. जिल्ह्यातील प्रवाशांना मुंबईला जाण्यासाठी ताटकळत जावे लागण्याची नामुष्की येणार आहे. मध्य रेल्वेने मध्य-दक्षिण रेल्वेच्या प्रस्तावाबाबत नकारात्मक भूमिका असल्याचे एका विश्वसनीय सूत्राने सांगितले. 


नाशिक जिल्ह्यातील प्रवाशांना मुंबईला जाण्या-येण्यासाठी सध्या हक्काच्या केवळ पंचवटी आणि राज्यराणी या दोन एक्स्प्रेस आहेत. मात्र, दक्षिण-मध्य रेल्वेने राज्यराणी मनमाड यार्डात १६ तास उभी रहात असल्याने नांदेडपर्यंत हलविण्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाला पाठविला आहे. मात्र, एक महिन्यापूर्वी खासदार हेमंत गोडसे आणि रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य राजेश फोकणे यांनी रेल्वे बोर्डाला पत्र पाठवून राज्यराणी नांदेडपर्यंत करण्याच्या निर्णयाला विरोध केला आहे. 


मनमाड ते मुंबई दरम्यान धावणारी राज्यराणी एक्स्प्रेस सध्या नुकसानीमध्ये धावत असल्याचे रेल्वे प्रशासनाचे म्हणणे आहे. राज्यराणीला एक्स्प्रेसला दादर स्थानकामध्ये थांबा दिल्यास प्रवाशी संख्येत वाढ होऊन तसेच वेळेमध्ये बदल केल्यास राज्यराणी निश्चित नफ्यामध्ये धावेल. मात्र, रेल्वे प्रशासन दादर स्थानकातील थांब्याबाबत आणि वेळेत बदल करण्यासाठी अनुकूल नसल्याचे दिसत आहे. दक्षिण-मध्य रेल्वेच्या प्रस्तावाला प्रवासी संघटनेचे रतन गाढवे, विपुल पेखळे, संजय शिंदे, मयूर यादव, शरद आहेर, तन्वीर शेख, चंद्रकांत देवरे, दिलीप कांबळे, राजेंद्र जगताप, सुधीर मोरे, विरांगणा पवार, लक्ष्मण पगारे यांनी राज्यराणी नांदेडपर्यंत करण्यास विरोध दर्शविला. 


थांबे वाढविण्याची गरज 
दोन्ही बाजूने धावणाऱ्या राज्यराणीच्या वेळेत बदल करण्याची गरज आहे. राज्यराणीला थांबे वाढविण्याची गरज आहे. राज्यराणी ही दक्षिण-मध्य रेल्वेमार्गावर धावू देणार नाही. 
- हेमंत गोडसे, खासदार 


द.मध्य रेल्वेकडून धूळफेक 
राज्यराणी आणि गोदावरीचा रेक हा एकच आहे. त्यामुळे राज्यराणी एक्स्प्रेस मनमाड स्थानकात १६ तास उभी राहते. हे खोटे असून निगराणीसाठी काही तास गाडी यार्डात जाते. त्यामुळे दक्षिण-मध्य रेल्वे ही धूळफेक करीत आहे. 
- राजेश फोकणे, सदस्य, रेल्वे सल्लागार समिती 

बातम्या आणखी आहेत...