आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भविष्य निर्वाह निधीबाबत 300 आस्थापनांना नोटीस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - भविष्य निर्वाह निधी उशिरा भरणा-या 300 वर आस्थापनांना भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने नोटीस बजावली आहे. या आस्थापनांना त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी मंगळवारी (दि. 8) सकाळी 10.30 वाजता सातपूर कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे वेळेत भविष्य निर्वाह निधी न भरणा-या आस्थापनांना यामुळे मोठी चपराक बसणार आहे.

भविष्य निर्वाह निधी संघटन, मुख्य कार्यालय, नवी दिल्ली यांच्या आदेशानुसार या नोटिसा बजावण्यात आल्या असून, कलम पी.एफ. कायद्याच्या कलम 14, 13 नुसार ही कारवाई करण्यात आली असल्याचे क्षेत्रीय भविष्य निर्वाह निधी आयुक्त जगदीश तांबे यांनी स्पष्ट केले. या आस्थापनांनी नुकसानभरपाई का भरू नये, असा प्रश्न या नोटिशीत विचारण्यात आला आहे. पी.एफ. भरणा करण्यास अनेक आस्थापना उशीर करतात, तर काही आस्थापना पी. एफ.चा भरणाच करीत नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असल्याने या प्रकारच्या कारवाईमुळे कामगारवर्गात समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

पी.एफ. चुकविणा-यांची होणार मालमत्ता जप्त
जिल्ह्यातील दोन साखर कारखान्यांकडे कोट्यावधींची भविष्य निधी वसुली थकबाकी असून जिल्ह्याची आर्थिक नाडी समजल्या जाणा-या बॅँकेकडेही अशीच मोठी थकबाकी आहे. भविष्य निधी भरण्यास टाळाटाळ केली जाते आणि नंतर कारवाईला आव्हान देत स्थगिती मिळविली जाते असा अनुभव आहे. मात्र दिल्लीतील सुत्रांच्या मते, भविष्य निधीने अधिक कडक भुमिका घेतली असून आता संस्थांच्या मालमत्तांवर टाच आणून भविष्य निधीची रक्कम वसुल केली जाणार असल्याचे आणि त्याची सुरूवात याच वर्षी आॅगस्ट महिन्यापासून होणार असल्याचे एका वरिष्ठ अधिका-याने स्पष्ट केले.