आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Providing Urban Ammonites In Rural Area Project, Nashik, News In Marathi

ध्येय विकासाचे: अब्दुल कलामांच्या संकल्पनेतील ‘प्युरा’ शिवनीत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- शहरी सुविधा ग्रामीण भागात देण्याचा प्रयत्न; आरोग्य विद्यापीठास 150 एकर जमीन देण्याचा ग्रामसभेचा ठराव माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या संकल्पनेतील ‘प्रोव्हायडिंग अर्बन अ‍ॅमिनिटिज इन रुरल एरिया’ (प्युरा) अर्थात शहरात उपलब्ध असलेल्या सर्व सुविधा ग्रामीण भागात पुरविणार्‍या प्रकल्पाची अंमलबजावणी नाशिक आणि दिंडोरीदरम्यानच्या शिवनी येथे होणार आहे. हा प्रकल्प साकार व्हावा, यासाठी शिवनीच्या ग्रामस्थांनी परिसरातील 150 एकर जमीन आरोग्य विज्ञान विद्यापीठाला देण्याचा ठराव ग्रामसभेत संमत करून तसा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविला.
पायाभूत सुविधांचा खर्च शासन करणार
‘प्युरा’ या प्रकल्पांतर्गत संपूर्ण देशात स्वयंपूर्ण खेडी विकसित करण्याचा विचार मांडण्यात आला आहे. त्यामुळे परवानगी मिळाल्यानंतर त्या भागातील रस्ते, पाणी, वीज या सुविधा उपलब्ध करून देण्याचा सर्व खर्च शासन उचलते. मात्र, त्यानंतर उभ्या राहणार्‍या प्रकल्पातून खेडी स्वयंपूर्ण करण्याची जबाबदारी संबंधित संस्थांना पार पाडावी लागते.

>ग्रामस्थांच्या ठरावाला जिल्हाधिकार्‍यांची मंजुरी मिळाल्यावर ‘प्युरा’साठी पाठपुरावा करू. प्रारंभी औषध कंपन्यांकडून खरेदीची हमी घेऊन आयुर्वेदिक वनस्पतींची लागवड करण्याचा मानस आहे. या माध्यमातून तसेच अन्य काही समांतर प्रकल्पांतून रोजगार निर्मिती होईल. त्यातून खेडी स्वयंपूर्ण करणे शक्य आहे. त्यासाठी पालकमंत्री भुजबळ यांच्याशीदेखील चर्चा केली आहे.
- डॉ. अरुण जामकर, कुलगुरू, आरोग्य विद्यापीठ

आरोग्य विद्यापीठ पाठविणार केंद्राकडे प्रस्ताव
राज्यातील केवळ नगर जिल्ह्यातील प्रवरा ट्रस्टला या प्रकल्पासाठी केंद्राने हिरवा कंदील दाखवला. आता नाशिकमध्ये जमीन मिळाल्यास ‘प्युरा’अंतर्गत प्रकल्प राबविण्यासाठीचा प्रस्ताव आहे, असे आरोग्य विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अरुण जामकर यांनी सांगितले.