आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Public Funding Scheme,latest News In Divya Marathi

जन-धन योजनेबाबत आता अफवांचे तण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- जन-धनयोजनेच्या खात्यात वर्षाला 30 हजार रुपये जमा होणार असून, अन्य काही अनुदानही मिळत असल्याच्या अफवांचे पीक जोमाने फोफावत असल्याने या योजनेद्वारे खाते उघडण्यासाठी बँकांत दिवसेंदिवस गर्दी होत आहे. काही दिवसांपूर्वीच या योजनेत खाते उघडून देण्यासाठी काही मंडळी शुल्क आकारत असल्याचे उघड झाल्यानंतर हा नवाच प्रकार समोर आला आहे. त्यामुळे केंद्र शासनाच्या या महत्त्वाकांक्षी योजनेचे स्वरूप लाभांबाबत असलेला संभ्रम संबंधित यंत्रणेने दूर करावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
प्रत्येक योजनेचा लाभ, अनुदान रोख स्वरूपात देणे बंद करण्यात आले असून, ते बँकेद्वारेच देण्यात येत आहे. परंतु, ग्रामीण भागासह शहरातील अनेक नागरिक बँकांपासून दूर असल्याने त्यांना बँक व्यवहारात आणण्यासाठी सन 2018 पर्यंत देशातील प्रत्येकाचे बँकेत खाते असावे म्हणून ही योजना आणली आहे. जन-धन योजनेतील खातेदाराचा आकस्मिक मृत्यू झाल्यास त्याच्या परिवाराला एक लाख रुपयांची विमा रक्कम देण्यात येणार असल्याचे बँकांना शासनाने कळविले आहे. त्याचबरोबर, खात्यावर जमा असलेल्या रकमेवर व्याज, कुठलीही अनामत ठेव घेता शून्य पैशावर खाते उघडणे, पाच हजार रुपयांपर्यंत कर्ज, घरखरेदी अथवा निर्मितीसाठी कर्ज, शिक्षण-कृषी अथवा कृषी विषयाशी निगडित उद्योग उभारणीसाठी कर्ज ओव्हरड्राफ्ट अशा सुविधा देण्यात येणार आहेत. या सेवांव्यतिरिक्त कुठलाही लाभ देण्यात येणार नाही. परंतु, नागरिकांत या खात्यावर वर्षाला ३० हजार रुपये, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र असलेले ‘जन-धन कार्ड’ अन्य काही प्रकारचे अनुदान देण्यात येत असल्याची अफवा पसरली आहे. त्यामुळे बँकेच्या दारावर नवीन खाते उघडण्यासाठी गर्दी होत आहे. विशेष म्हणजे, ज्यांचे खाते राष्ट्रीयकृत बँकेत आहे, असेही नागरिक नव्याने खाते उघडण्यासाठी गर्दी करीत आहेत. त्यामुळे याेजनेच्या मूळ हेतूलाच बाधा पोहोचत आहे.
30 हजारांचा सर्वसाधारण विमा
शहरातजन-धन योजनेबाबत वेगवेगळ्या अफवा पसरवल्या जात आहेत. ३० हजार रुपये खात्यात जमा होणार असून, खातेदारांचा तितक्या रकमेचा सर्वसाधारण विमा काढला जाणार आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवता आपले खाते उघवावे. -बाबुलाल बंब, क्षेत्रीयमहाव्यवस्थापक, स्टेट बँक
योजनेची नेमकी माहितीच नाही
राजीवगांधी जीवनदायी आरोग्य योजनेप्रमाणे जन-धन योजनेचे कार्ड देण्यात येणार असल्याची वर्षाला किमान 30 हजार रुपये खात्यावर जमा होणार असल्याची अफवा आहे. ही योजना नेमकी काय आहे? याची अनेकांना माहितीच नसल्याची बाब यामुळे समोर आली आहे.