आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावाना वाद; चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - सार्वजनिक वाचनालयाच्या कार्यकारी मंडळात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली धुसफूस मंडळाच्या साेमवारच्या बैठकीत काहीशी कमी झाली असून, दाेन्ही बाजूंनी थाेडा सामंजस्याचा पवित्रा घेतल्याचे सांगण्यात येत असले तरी चर्चेचे गुऱ्हाळ मात्र अजून सुरूच राहणार अाहे. साेमवारी दुपारपासून सायंकाळी उशिरापर्यंत दीर्घकाळ चाललेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याचा दावा दाेन्ही बाजूंकडून केला जात अाहे.
गेल्या अाठवडाभरापासून सुरू असलेल्या सावानातील ‘नाट्यमय’ घडामाेडींकडे समस्त नाशिककरांचे लक्ष लागलेले हाेते. कार्याध्यक्ष विनया केळकर, कार्यवाह मिलिंद जहागिरदार अर्थसचिव स्वानंद बेदरकर यांच्यावर विविध अाराेप ठेवत अध्यक्ष विलास अाैरंगाबादकर यांनी त्यांना अापले काम थांबवण्याचा अादेश देऊन जहागिरदार यांच्याकडे ३७, केळकर यांच्याकडे २६, तर बेदरकर यांच्याकडे १३ मुद्द्यांचा खुलासा सात दिवसांच्या अात मागितला हाेता. मात्र, त्या अवधीत या त्रयींनी खुलासा दिलेला नव्हता. उलट, पत्रकार परिषद घेऊन अध्यक्षांना अशा प्रकारचा अादेश देण्याचा अधिकारच नसल्याचे सांगत प्रतिहल्ला चढवला हाेता. या साऱ्या पार्श्वभूमीवर रविवारी झालेली बैठक वादविवादाच्या वातावरणात अधिकच भर घालणारी ठरली हाेती. त्यामुळे साेमवारच्या बैठकीत काय हाेणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले हाेते.

साेमवारी दुपारी तीन वाजता सुरू झालेल्या बैठकीत दाेन्ही बाजूंकडून सामंजस्याचा सूर लावण्यात अाल्याचे सांगण्यात येते. या चर्चेत केळकर, जहागिरदार, बेदरकर यांनी त्यांच्याकडे मागितलेल्या मुद्द्यांचा खुलासा देणार असल्याचे सांगितले. तसेच, काेणत्याही प्रकारे गैरसमजांमध्ये वाढ हाेऊ नये, याबाबत काळजी घेण्याचा विचार पुढे अाल्यानंतर त्यावरही सहमती झाली. बैठकीला अध्यक्ष अाैरंगाबादकर, जहागिरदार, केळकर यांच्यासह सुरेश गायधनी, प्रभारी कार्यवाह कर्नल अानंद देशपांडे, प्रभारी कार्याध्यक्ष अभिजित बगदे, किशाेर पाठक अादी उपस्थित हाेते.

मंगळवारीही चर्चा सुरू राहील...
^साेमवारी कार्यकारी मंडळाच्या बैठकीत संबंधितांची बाजू एेकून सकारात्मक चर्चा करण्यात अाली. चांगल्या वातावरणात प्रदीर्घ काळ चर्चा झाली. मंगळवारीही बैठक हाेणार असून, त्यात पुन्हा चर्चा हाेईल. ती सामंजस्यपूर्ण वातावरणात करण्यावर भर देण्यात येत अाहे. विलास अाैरंगाबादकर, अध्यक्ष, सावाना
बातम्या आणखी आहेत...