आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सार्वजनिक वाचनालयात भाजप पदाधिकाऱ्याची शिलेदारी...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - एखाद्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये एक जरी राजकीय पदाधिकारी असेल तर संस्थेत कसे राजकारण घुसू पाहते, याचे उदाहरण सार्वजनिक वाचनालयात बघायला मिळाले. सावानाच्याच एका पदाधिकाऱ्याच्या साथीने भाजपच्या एका पदाधिकाऱ्याने ‘ना-ना’ तऱ्हेने शिलेदारीचा प्रत्यय देत, सावानात शिरकाव करून एका विद्यार्थ्याला अभ्यासिकेत प्रवेश मिळवण्यासाठी प्रयत्न केले. या नापास विद्यार्थ्याला प्रवेश दिल्यामुळे मात्र गेल्या ३० वर्षांपासून प्रामाणिकपणे संस्थेची सेवा करत असलेल्या ग्रंथपाल शाेभना वैद्य यांना कारणे दाखवा नाेटीस बजावण्यात अाली अाहे.
सार्वजनिक वाचनालयाच्या अभ्यासिकेत अभ्यासासाठी अनेक विद्यार्थ्यांची रिघ लागते. काही दिवसांपूर्वी एक छाेटी घटना घडल्याने अभ्यासिकेसाठीचे नियम पदाधिकाऱ्यांनी कडक केले अाहेत. यात मुख्य म्हणजे ५० टक्क्यांहून अधिक गुण असलेल्या विद्यार्थ्यालाच प्रवेश दिला जाताे, तर नापास विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातच नाही. एका परदेशी नामक विद्यार्थ्याला सावानाच्या अभ्यासिकेत प्रवेश हवा हाेता. मात्र हा विद्यार्थी दाेन विषयांत नापास असल्याने त्याला प्रवेश नाकारण्यात अाला हाेता. तसे ग्रंथपाल वैद्य यांनी कार्यवाह मिलिंद जहागीरदार यांना कळविले देखील हाेते. मात्र दाेन दिवसांनंतर हाच विद्यार्थी भाजपच्या एका शिलेदाराला घेऊन सावाना कार्यालयात अाला. अापल्याच पक्षाशी संबंधित एका वाचनालय पदाधिकाऱ्यांची मदतही या शिलेदाराने यासाठी मागितली. अर्थात या दाेघांच्या दबावापाेटी ग्रंथपाल वैद्यबाईंनी या विद्यार्थ्याला प्रवेश दिलाही. असे त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिलेल्या खुलाशात नमूद केले अाहे.

मात्र पदाधिकाऱ्यांना हे कळल्यावर त्यांनी संस्थेच्या नियमांचे उल्लंघन का केले, या प्रकरणी काही गैरव्यवहार झाला किंवा कसे, याबद्दल ग्रंथपाल वैद्य यांना कारणे दाखवा नाेटीस बजावण्यात आली. दुसऱ्या दिवशी भाजपचे हे पदाधिकारी वाचनालयाचे कार्यवाह जहागीरदार यांची भेट घेण्यासाठी पुन्हा सावानामध्ये दाखल झाले. यावेळीही त्यांनी कार्यकारिणीतील अाणखी काही पदाधिकाऱ्यांची नावे घेत त्या विद्यार्थ्याला प्रवेश मिळविण्यासाठी प्रयत्न सुरूच ठेवले. पण कार्यवाह अाणि त्यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. या सगळ्या प्रकरणात अडकल्या त्या ग्रंथपालबाई. मुळातच एखाद्या संस्थेला नियम असतात अाणि ते नियम ताेडून संस्थेतील कर्मचाऱ्यांवर दबाव अाणून असे प्रवेश मिळविणे कितपत याेग्य अाहे, हे सावानाच्या त्या पदाधिकाऱ्यालाही कळायला हवे हाेते अाणि त्या विद्यार्थ्याच्या मदतीसाठी धावून अालेल्या भाजपच्या त्या शिलेदारालाही.