आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘सावाना’तील घडामाेडींवर उद्या पडदा शक्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - नाशिकच्या साहित्य-संस्कृतीचा केंद्रबिंदू असलेल्या सार्वजनिक वाचनालयातील अंतर्गत गटबाजी गेल्या काही दिवसांपासून चांगलीच वेशीवर अालेली अाहे. सावानाच्या १७५ वर्षांच्या इतिहासात प्रथमच अध्यक्षांना प्रमुख पदाधिकाऱ्यांना काम बंद करण्याचा अादेश द्यावा लागला, याची नाशिकच्या साहित्य क्षेत्रात चांगलीच चर्चा झाली. या प्रकरणी अाता कारवाई झालेले पदाधिकारी वकिलांच्या सल्ला घेणार अाहेत, तर सावानाच्या कार्यकारी मंडळाची रविवारी बैठक हाेणार असून, त्यानंतर या प्रकरणावर अधिक प्रकाश पडणार असल्याचे दिसते.

सावाना कार्यकारी मंडळाची बैठक : सार्वजनिक वाचनालयाच्या कार्याध्यक्ष विनया केळकर, कार्यवाह मिलिंद जहागिरदार अाणि अर्थसचिव स्वानंद बेदरकर या तिघांवर विविध अाराेप ठेवत अध्यक्ष विलास अाैरंगाबादकर यांनी घटनेतील २२/५चा अाधार घेत या तिघांनाही अापले काम थांबवण्याचा अादेश दिला. तसेच, या अादेशाबराेबर जहागिरदार यांच्याकडे ३७, केळकर यांच्याकडे २६, तर बेदरकर यांच्याकडे १३ मुद्द्यांचा खुलासा दिवसांच्या अात मागितला हाेता. या तिघांनीही हा खुलासा दिवसांत दिल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात अाली. या सर्व पार्श्वभूमीवर सावानाच्या कार्यकारी मंडळाची बैठक रविवारी(दि. २३) दुपारी वाजता हाेणार अाहे. या घडमाेडी साहित्यिक वर्तुुळात चर्चेचा विषय ठरल्या असून, रविवारकडे अाता सर्वांचे लक्ष लागले अाहे.

काहीच बाेलायचे नाही
सावाना कार्यकारिणीवर मला काही दिवसांपूर्वी घेतले. पण, अाता अचानक मला काढण्यात अाल्याचे पत्र मिळाले. याचे अाश्चर्य वाटले, पण धक्का बसलेला नाही. मला या विषयावर काहीच बाेलायचे नाही. - वंदना अत्रे, माजी सदस्य, सावाना

त्यांची नियुक्ती बेकायदेशीरच
जहागिरदार यांनी अत्रेंना थिगळेंच्या जागेवर घेतले हाेते. मी त्या काळात परदेशी हाेताे. ताे कार्यभार तत्कालीन उपाध्यक्ष वासुदेव दशपुत्रेंकडे हाेता. मुळातच थिगळे या लाेकशाहीने निवडून अालेल्या अाहेत. त्यांना अशा पद्धतीने काढण्याचा अधिकार काेणालाही नाही. त्यावेळी थिगळेंना तुमचे म्हणणे लेखी मांडा, असे सांगण्यात अाले. त्यांना त्यांची बाजू मांडण्यासाठी भेटायला का नाही बाेलावले? थिगळेंनी एक माेठे पत्रही दिले हाेते, त्याकडे यांनी पूर्णत: दुर्लक्ष केले अाणि वंदना अत्रेंना कार्यकारिणीत घेतले. हे चुकीचेच नव्हे, तर बेकायदेशीर अाहे. त्यामुळेच अाम्ही पुन्हा अत्रेंना पत्र दिले अाहे अाणि थिगळेंना त्यांची जागा देणार अाहाेत. -विलास अाैरंगाबादकर, अध्यक्ष, सावाना

मिलिंद जहागिरदार, विनया केळकर अाणि स्वानंद बेदरकर या तिघांनीही कारवाई झाल्यानंतर ‘अध्यक्षांनी अामच्यावर अन्याय केल्याची’ सामूहिक प्रतिक्रिया दिली हाेती. पण, अाता जहागिरदार, केळकर अाणि बेदरकर हे शनिवारी (दि. २२) वकिलांचा सल्ला घेऊन पुढील दिशा ठरविणार असल्याचे जहागिरदार यांनी सांगितले. किंबहुना एक-दाेन दिवसांतच जहागिरदार पत्रकार परिषदेत अापली भूमिका मांडणार अाहेत. त्यामुळे रविवारपर्यंत यातील अनेक घडामाेडींवर प्रकाश पडणार अाहे. त्यानंतरच हे प्रकरण अाणखी चिघळते की निवळते, हे स्पष्ट हाेण्याची शक्यता अाहे.

वंदना अत्रेंनाही पत्र
मिलिंदजहागिरदार यांनी चार महिन्यांपूर्वी प्रा. वेदश्री थिगळे यांच्या रिक्त जागेवर वंदना अत्रे यांना घेतले हाेते. अाता मात्र प्रभारी कार्यवाह अॅड. अभिजित बगदे यांनी अत्रे यांना कार्यकारी मंडळाचे सभासदत्व रद्द झाल्याचे पत्र दिले अाहे.
बातम्या आणखी आहेत...