आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

साहित्यिक मेळाव्यातून मान्यवरांशी संवाद, सार्वजनिक वाचनालयातर्फे २७,२८ सप्टेंबर रोजी संमेलन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही जिल्हा साहित्यिक मेळाव्याचे आयोजन २७ आणि २८ सप्टेंबरला करण्यात आले आहे. संमेलनाचे उद‌्घाटन अनिल अवचट यांच्या हस्ते होणार असून, मेळाव्याच्या अध्यक्षपदी डॉ. मीना वैशंपायन राहणार आहेत. जिल्हा साहित्यिक मेळाव्याच्या आयोजनाचे यंदाचे ४७ वे वर्ष असून, यंदादेखील मान्यवर साहित्यिकांना ऐकण्याची संधी नाशिककरांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. मेळाव्याचा शुभारंभ शनिवारी (दि. २७) सायंकाळी वाजता कविसंमेलनाने होणार आहे. कविसंमेलनाचे उद‌्घाटक नंदकिशोर भुतडा असून, अध्यक्षस्थानी आसिफ सय्यद राहणार आहेत.
प्रदीर्घ परंपरा यंदाही कायम
नाशिकच्यासांस्कृतिक चळवळीचे केंद्र असलेला सावानाचा साहित्यिक मेळावादेखील आता हळूहळू सुवर्ण महोत्सवाकडे वाटचाल करू लागला आहे. त्यामुळे नाशिकमधील साहित्याशी निगडित प्रत्येक नागरिकाच्या मनात या मेळाव्याचे एक वेगळे महत्त्व असून, यंदाचा मेळावादेखील त्या परंपरेतूनच साकारला जाणार आहे.
अनिल अवचट ठरणार आकर्षण
रविवारी(दि. २८) औपचारिक शुभारंभ होणार असून, प्रख्यात साहित्यिक अनिल अवचट यांचे उद‌्घाटनपर व्याख्यान सकाळी १० वाजता होणार आहे. ‘साहित्यावर बोलू काही’ या विषयावर अवचट यांचे व्याख्यान आहे. त्यानंतर ठीक ११ वाजता मेळाव्याच्या अध्यक्षा डॉ. मीना वैशंपायन यांची मुलाखत होणार आहे. मुलाखतीनंतर डॉ. अ. वा. वर्टी कथा स्पर्धा आणि कवी गोविंद काव्यस्पर्धेतील पारितोषिकांचे वितरण करण्यात येणार आहे.
मान्यवरांचा परिसंवाद
डॉ.चंद्रकांत वर्तक स्मृती परिसंवाद दुपारी वाजता ‘समाजाला ललित साहित्याची गरज नाही’ या विषयावर रंगणार आहे. त्यात अनंत येवलेकर, अभय सदावर्ते, शंकर बोऱ्हाडे , डॉ. सतीश श्रीवास्तव, वंदना अत्रे, किशोर पाठक आणि डॉ. दिलीप धोंडगे यांचा सहभाग राहणार आहे. दुपारी ३.३० वाजता नंदन रहाणे यांचा ‘आठवणींची चाळता पाने’, ४.३० वाजता ‘व्हॉट‌्स अ‍ॅप मिश्किली’, तर सायंकाळी ५.३० वाजता ‘मराठी लघुपटांचे विश्व’ या विषयावर रघुनाथ फडणीस हे सादरीकरण करणार आहेत.