आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चलन कुचंबणेनंतरही नागरिकांकडून नाेटाबंदीला समर्थन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - बँकांमध्ये पैशासाठी रांगा... सेवानिवृत्ती वेतन-पगार काढण्यासाठी बँकांमध्ये महिन्याच्या तारखेपासून गर्दी... बँकांकडे रकमेची चणचण.. ९० टक्के एटीएमही बंद.. यामुळे त्रास हाेत असूनही बहुचर्चित नाेटाबंदी निर्णयाला अाजही ८० टक्के लाेकांचा पाठिंबा असल्याचे ‘दिव्य मराठी’च्या पाहणीत समाेर अाले अाहे. माेदींच्या या निर्णयाला गुरुवारी (दि. ८) एक महिना पूर्ण हाेत असल्याच्या पार्श्वभूमीवर ‘दिव्य मराठी’ने शहरातील स्टेट बँक अाॅफ इंडिया, बँक अाॅफ बडाेदा, बँक अाॅफ इंडिया, एचडीएफसी, बँक अाॅफ महाराष्ट्र यांसारख्या प्रमुख बँकांमध्ये जाऊन ग्राहकांचा कल जाणून घेतला.

या निर्णयामुळेच शहर कॅशलेस इकाॅनाॅमीकडे झपाट्याने वाटचा करीत असल्याचे चित्र अाहे. पेट्राेलपंपांवर ४० टक्के व्यवहार कॅशलेस हाेत अाहेत. महापालिका, पाेस्ट, वीज मंडळ यांना तर या निर्णयामुळे घबाडच हाती लागल्याचे चित्र अाहे. एसटी अाणि रेल्वेने प्रवासात सुरुवातीला झालेला गाेंधळ हळूहळू कमी हाेत अाहे. दुसरीकडे, शहराच्या उद्याेग क्षेत्राला काही प्रमाणात तरी मंदीला ताेंड द्यावे लागले अाहे. प्रशासनाने कॅशलेस व्यवहार करण्याचे अावाहन केले असले तरी त्यासाठी अावश्यक तयारी मात्र हवी त्या प्रमाणात झालेली नसल्याचे चित्र अाहे. बँकिंग व्यवहार पंधरवड्यात सुरळीत हाेतील, असे दिसत अाहे.

जिल्ह्यातील बँकांना अाज चलन उपलब्ध...
पहिल्या आठवड्यात शासकीय, निमशासकीय तसेच खासगी अास्थापनांच्या कर्मचाऱ्यांचे वेतन, पेन्शन बँकेत जमा होते. त्यासाठी जिल्ह्यास ५०० रुपयांच्या नोटांची नितांत गरज आहे. त्यानुसार २०० ते २५० कोटींच्या केवळ पाचशेच्या नोटांची मागणी नाशिकमधून आरबीआयकडे करण्यात आली. मात्र, राज्यात इतरत्र स्थिती बिकट असल्याचे सांगत जिल्ह्यास आठवडाभर चलनच मिळू शकलेले नाही. आता आरबीआयकडून नवीन चलन पुरवठ्यासाठी जिल्ह्यातील बँकांना डिसेंबर तारीख देण्यात आल्याने गुरुवारी जिल्ह्याला चलन उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
बातम्या आणखी आहेत...