आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निधीचा धक्का, सुखमय प्रवास पक्का, विविध उपायांनी सार्वजनिक वाहतूक सेवा चालेल फायद्यात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- जगातील प्रगत शहरांत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था विकासाचा कणा मानली जाते. दुर्दैवाने नाशिकमध्ये या व्यवस्थेकडे गांभीर्याने पाहिले गेलेले नाही. गेल्या दीड दशकात शहरातील प्रवासीसंख्येत तब्बल पाच लाखांनी वाढ झाली; मात्र बसची संख्या तेवढीच अाहे.
सध्या २२५ बसेसमधून दरराेज ६५ हजार विद्यार्थ्यांसह एक लाख ८५ हजार नाशिककर जीव मुठीत धरून प्रवास करतात. महापालिकेच्या अर्थसंकल्पासह केंद्र राज्य शासनाच्या विविध याेजनांतून अाणखी २५० ते ३०० बसेस उपलब्ध झाल्यास सार्वजनिक वाहतुकीचा प्रश्न निश्चितपणे सुटेल.
शहरातील माेजक्याच अंतर्गत रस्ते, नववसाहतींपर्यंत बस पाेहोचली अाहे. शहरालगतच्या २० किलाेमीटर अंतरापर्यंतच्या गिरणारे, सायखेडा, चांदाेरी, सुकेणे, जातेगाव, वाडीवऱ्हे, माेहाडी, अाेझर, एचएएलपर्यंत शहर बसद्वारे प्रवासी वाहतूक हाेते. महिला विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र शहर बसची व्यवस्था असून, निमाणी, सीबीएस नाशिकराेड येथून दिवसभरातून ४० फेऱ्या पूर्ण हाेतात. या बसची संख्या फेऱ्या वाढविण्याची मागणी हाेत अाहे.

करात सूट द्या : राज्यातमुंबई, पुणे असो की ठाणे, रत्नागिरी, सांगली, या शहरांमध्ये बससेवेची जबाबदारी महापालिकेनेच उचलली अाहे. मात्र, नाशिक महापालिकेला ही जबाबदारी पेलणे शक्य नसले तरी किमान करप्रणालीत सूट देण्याची मागणी एसटीकडून केली जाते. यामध्ये शहर बससेवेसाठी मालमत्ता कर, रस्ते कर इंधनावरील एलबीटी अशी एकूण वर्षाकाठी एक काेटीची करापाेटी जमा हाेणारी रक्कम मंडळाला बससेवेसाठी खर्ची करता येईल, जेणेकरून ताेट्यात घट हाेईल.
सद्यस्थितीत पंचवटीत शहर बसेससाठी एकच डेपाे अाहे. अनेक वर्षांपासूनची नाशिकराेड स्वतंत्र बस डेपोची मागणी पूर्णत्वास अाली अाहे. हा डेपाे महिनाभरात सुरू हाेणार असल्याचे सांगण्यात येतेे, तर सातपूर येथे एसटीच्या मालकीची जागा असून, तिथेही डेपो प्रस्तावित अाहे. महापालिकेकडून अार्थिक मदत मिळाल्यास ताेही कार्यान्वित हाेऊ शकताे. यामुळे बसेसची वारंवारिता वाढून शून्य भारमान म्हणजे एकही फेरी रिकामी जाणार नाही.

डबल डेकरचा प्रयाेग गरजेचा
1998 पर्यंत शालिमार-नाशिकराेड, अंबड-गंजमाळ, पंचवटी मार्गावर डबल डेकर सुरू होत्या. त्या नंतर बंद झाल्या. एसटी महामंडळाने उड्डाणपूल नसलेल्या मार्गांवर डबल डेकर चालविल्यास एका बसची वाहतूक दुपटीने वाढेल. त्यामुळे नफाही वाढेल.
वाहतूक जीवघेणी, लक्ष देत नाही काेणी
सीबीएस,अशाेक स्तंभ, रेड क्राॅस शालिमार चाैकातील थांब्यांवर शाळा-महाविद्यालये सुटण्याच्या वेळी विद्यार्थ्यांची गर्दी हाेते. विद्यार्थी बसला लटकून घराकडे जातात. अनेकांचा चाकात अडकून जीव गेल्याच्याही घटना घडल्या अाहेत.
..तर िनश्चितपणे सुटू शकते समस्या...
विद्यार्थ्यांसाठीविशिष्ट वेळेत प्रमुख थांब्यांसाठी बसेस साेडल्या पाहिजेत. त्यामुळे महामंडळाला पासधारी विद्यार्थ्यांचे हक्काचे उत्पन्न कायम राहील. त्यासाठी गर्दीच्या थांब्यांवर पाहणी करून सरासरी प्रवासी संख्येप्रमाणे फेऱ्या वाढवाव्या लागतील.
पाटणकर समिती काय सांगते?
पाटणकरसमितीनुसार, एक लाख लाेकसंख्येमागे किमान ६० बस असाव्यात. नाशकात हे प्रमाण केवळ १४ अाहे. एकूण ५०० बस उपलब्ध झाल्यास समस्या मार्गी लागेल. त्यातील २०० नाशिकराेड १०० सातपूर अागारात उभ्या करून नियाेजन शक्य अाहे.
चक्री वा काॅलनी बसची हवी सुविधा
शहरातीलगल्लाेगल्लीपर्यंत एसटी बस पाेहोचलेल्या नाहीत. एसटी बसने चक्री बस वा काॅलनी बस सुरू करण्याची गरज अाहे. त्यासाठी प्रवासी वाहतुकीचे सर्वेक्षण करून जेथे जास्त प्रतिसाद अाहे, अशा भागासाठी ठराविक अंतराने बस पुरवण्याची गरज अाहे.
नियोजन अचूक व्यवस्थापनाची गरज
शहरबससेवेसाठी पंचवटीत प्रमुख अागार अाहे. प्रदीर्घ पाठपुराव्यानंतर नाशिकराेडला दुसरे अागार तयार झाले; मात्र ते पूर्ण क्षमतेने कार्यान्वित हाेणे गरजेचे अाहे. सातपूरला स्वतंत्र अागाराची गरज अाहे. ते झाले तर बसफेऱ्यांचे अचूक व्यवस्थापन हाेईल.