आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शंभर कोटींची कामे सापडली संकटात, खडखडाटाने 'सार्वजनिक बांधकाम' पुढे निधीचा प्रश्न

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- महापालिकेच्या तिजोरीतील खडखडाट लक्षात घेता, सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे होणाऱ्या रस्ते वा नवीन अशा जवळपास १०० कोटींच्या कामांना ब्रेक लागण्याची शक्यता आहे. तसे झाले तर नगरसेवकांच्या विकासकामांच्या यादीतील अनेक संभाव्य कामांना कात्री लागू शकते.
आयुक्तांनी अंदाजपत्रकाच्या पुनर्नियोजनात गरजेवर आधारित कामांनाच प्राधान्य देण्याची सूचना केल्यामुळे निविदा स्तरावरील ५० कोटी, तर निविदा होऊन कार्यारंभ आदेश बाकी असलेल्या ५० कोटींच्या कामांना लाल कंदील दाखवला जाईल, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
एलबीटीमुळे पालिकेची आर्थिक परिस्थिती नाजूक असताना, स्थायी समिती ते महासभा अशा प्रवासात अंदाजपत्रक तीन हजार कोटींपर्यंत गेले आहे. मुळात, आयुक्तांनी सादर केलेले अंदाजपत्रक १८०० कोटींपर्यंत होते. गतवर्षाचा अनुभव पाहता आयुक्तांनी सादर केलेल्या अंदाजपत्रकाइतक्याच रकमेची कामे झाली होती. यंदाही तशीच परिस्थिती असल्यामुळे आयुक्तांच्या अंदाजाइतक्या रकमेची, म्हणजेच १८०० ते २००० कोटींपर्यंतची कामे होण्याची शक्यता आहे. मात्र, विधानसभा निवडणूक व सर्वच नगरसेवकांना ह्यनवनिर्माणाह्णचे वेध लागल्यामुळे अंदाजपत्रक तीन हजार कोटींपर्यंत गेले. त्यातून पालिकेवरील ह्यस्पिल ओव्हरह्ण अर्थातच दायित्वाचे देणेही वाढणार आहे.
पालिकेला आर्थिक बोजा परवडण्याजोगा नसून, त्यामुळे पालिका दिवाळखोरीच्या दिशेने जाण्याचीही भीती आहे. सहा महिने आयुक्त नसल्यामुळे पालिकेवरील प्रशासकीय नियंत्रण हरवले होते. आता डॉ. प्रवीण गेडाम यांनी सूत्रे स्वीकारल्यावर आर्थिक बाबींकडे लक्ष केंद्रित केले आहे. ह्यस्पिल ओव्हरह्णवर िनयंत्रण ठेवण्यासाठी त्यांनी काही दिवसांपूर्वीच प्रत्येक विभागासाठी निधीची तरतूद, वापरलेला निधी, शिल्लक निधी, निविदा स्तरावरील कामे, निविदा प्रक्रिया पूर्ण करून कार्यारंभ आदेशाच्या प्रतीक्षेत असलेली कामे याचा तपशील मागवला आहे. त्यातून गरजेवर आधारित कामांचे िनयोजन करून त्याच कामांसाठी निधी द्यायचा व जेथे गरज नसेल त्या विभागाचा निधी अन्यत्र वळवण्याचाही प्रयत्न आहे. मुळात, बांधकाम खात्यासाठी केलेली तरतूद यापूर्वीच संपुष्टात आली आहे. जास्तीत जास्त दीडपट कामे करण्याचा निकष लागू होणार असल्यामुळे तातडीचे काम सांगून मोठी उड्डाणे घेण्यावरही आता निर्बंध येणार आहेत.
प्रवासी फायली रद्द?
नगरसेवकांनी सुचवलेल्या स्वनिधीतील फायली, नवीन रस्ते, किरकोळ दुरुस्तीच्या फायली अडचणीत सापडल्या आहेत. अनेक जुन्या फायली ह्यप्रशासकीय प्रवासाह्णत आहेत. या फायलींतील कामांची अंदाजपत्रके जुन्या डीएसआरप्रमाणे, अर्थातच बांधकाम दरसूचीप्रमाणे तयार केलेली आहेत. या कामांवरही लाल फुली मारली जाण्याची शक्यता असून, नवीन डीएसआरप्रमाणे अंदाजपत्रक करण्याच्या सूचना दिल्या जात असल्याची नगरसेवकांची तक्रार आहे. तसे करायचे झाले तर पुन्हा सर्व प्रक्रिया करावी लागणार असून, त्यासाठी लागणारा वेळ व प्रक्रियेमुळे नगरसेवक अस्वस्थ झाले आहेत.