आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून विरोधकांचे राजकारण; पुण्याच्या महापौर टिळक यांची सारवासारव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांचे वक्तव्य घटनाविरोधी असल्याचा आरोप करत विरोधकांनी ‘आरक्षणातूनच मिळालेले महापौरपद सोडणार का,’ असा सवाल करत शनिवारी महापौरांवर टीका केली. दरम्यान, मुक्ता टिळक यांनी विरोधकांचे सर्व आरोप फेटाळत ‘माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून विरोधक राजकारण करत आहेत,’ असे सुनावले.  
  
आरक्षणामुळे ब्राह्मण समाजातील मुले शिक्षणासाठी परदेशात जातात, असे वादग्रस्त विधान महापौर मुक्ता टिळक यांनी शुक्रवारी केले होते. त्यांच्या या विधानाला विरोधी पक्षांनी जोरदार आक्षेप घेत त्यांच्यावर टीका केली. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे महापौरांच्या नारायणपेठ येथील निवासस्थानासमोर निदर्शने करण्यात आली. विरोधी पक्षनेते चेतन तुपे म्हणाले,‘महापौरांचे हे वक्तव्य लज्जास्पद आहे आणि घटनाविरोधी आहे. खुद्द टिळक यांना महापौरपद आरक्षणातूनच मिळाले आहे. आरक्षण त्यांना मान्य नसेल तर त्यांनी आरक्षणातून मिळालेले महापौरपद सोडावे.’ टिळक यांनी विरोधकांचे आरोप फेटाळत माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला जात आहे. विरोधक त्याचे राजकारण करत आहेत. आरक्षणाला माझा आणि माझ्या पक्षाचा विरोध अजिबात नाही, असे त्या म्हणाल्या.
 
 
 
 
बातम्या आणखी आहेत...