आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pune University News In Marathi, Online Examination Application, Divya Marathi, Nashik

पुणे विद्यापीठाच्या ऑनलाइन परीक्षा अर्ज भरण्याच्या सूचनांमध्येच चुका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - पुणे विद्यापीठातर्फे चालू शैक्षणिक वर्षासाठी पदवी, पदव्युत्तर परीक्षांसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अर्ज कसा भरावा या सूचनांमध्ये असंख्य चुका आहेत. त्यात कोणत्याही प्रकारे इंग्रजीचे नियम पाळले गेलेले दिसत नाहीत. विद्यापीठाची काही स्वतंत्र इंग्रजी आहे की काय किंवा हे विद्यापीठाचे अधिकृत संकेतस्थळच नाही की काय, अशी शंका या भयंकर चुका पाहून येते.
पुणे विद्यापीठाने प्रसिद्ध केलेल्या या सूचनांमध्ये व्याकरण नियम, स्पेलिंग, विरामचिन्हे, दोन शब्दांमधील स्पेस, कॅपिटल किंवा स्मॉल अक्षरे या गंभीर चुकांसह अनेक तांत्रिक चुकाही आढळतात. ज्या ठिकाणी कॅपिटल लेटर हवे तेथे स्मॉल, तर अनेक ठिकाणी गरज नसताना मध्येच कॅपिटल लेटर्स वापरण्यात आलेले आहेत.
सूचनांची सुरुवातच मजेदार आहे 'Instructions for filling Application Form'. 'You have to create a new account in order to apply for Exam Form.' तर याच ओळीखाली Mannual या शब्दाचे स्पेलिंग Mnaul असे दिले आहे. त्याच्या खालील ओळीत एकदा PRN तर एकदा Prn असे लिहिलेले आहे. एका ठिकाणी on line तर दुसर्‍या जागी ONLINE तर तिसर्‍या ठिकाणी आणखी तिसरेच रूप या एका शब्दाचे दिसते. Mark sheets, Email Id, Email ID यांसारखे शब्द एकाच अर्थासाठी आहेत की, यापैकी एखादा संक्षेप म्हणून वापरला आहे, असा विद्यार्थ्यांचा गोंधळ होत आहे.
a, an, the यांचा वापर इंग्रजी येणार्‍या कोणत्याही व्यक्तीला खटकेल, असा केला आहे. जेथे गरज आहे तेथे नाही आणि जिथे नको तिथे ही उपपदे चारही पानांवर जागोजाग आढळतात.
व्याकरणाच्या चुका
0 Please select the correct examination form which you wants to apply.
0 Husbad/Father name (apostrophe 's नाही).
0 Prefilled Examination form will get appeared on screen with your Name and College. If you find Name is incorrect, kindly check the PRN no entered.
0 All Subjects applicable to you will get listed on the form, these subjects includes both Compulsory and Backlog subjects (if there).
तांत्रिक त्रुटींमुळे अर्ज भरताना विद्यार्थ्यांचा गोंधळ
महाविद्यालय असलेल्या गावाऐवजी फक्त कॉलेजचा कोड येतो. त्यामुळे विद्यापीठांतर्गत सारख्या नावाच्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा गोंधळ होऊ शकतो. मागील परीक्षा कोणत्या वर्षी/महिन्यात दिली हा रकाना भरताना दिलेल्या पर्यायात विनाकारण महिन्याचा क्रम (उदा. डिसेंबर 12, जानेवारी 01) असा दिलेला आहे. कोणत्या माध्यमातून परीक्षा दिली, या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी फक्त इंग्रजी आणि मराठी असे दोनच पर्याय आहेत. त्यामुळे हिंदी आणि उर्दू माध्यमाच्या किंवा हिंदी/उर्दू विषय घेतलेल्या विद्यार्थ्यांना अडचण येत आहे. क्रेडिट सिस्टिीमच्या पहिल्या सत्रातील परीक्षेत काही विद्यार्थी एकापेक्षा अधिक विषय नापास असताना फक्त एक विषय बॅकलॉग म्हणून फॉर्ममध्ये दिसतो. त्यामुळे पहिल्या राहिलेल्या पेपरच्या परीक्षेचे काय, असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर उभा ठाकला आहे.
गांभीर्य अन् जबाबदारपणा आवश्यक
परीक्षा नियंत्रकाऐवजी एखाद्या कनिष्ठ लिपिकाकडून करून घेतलेला हा फॉरमॅट वाटतो. माहिती न तपासता तशीच लाँच केल्याने ढोबळ चुकासुद्धा तशाच राहिल्या आहेत. ही कामे गांभीर्याने आणि जबाबदार व्यक्तीने करायला हवीत. - श्रावस्ती, विद्यार्थिनी
एसएमएससारखी अजब इंग्रजी भाषा
स्पेलिंग, थेट अर्थ नसलेली ही भाषा आहे. त्यातील अर्थ आपल्यालाच समजून घ्यावा लागतो. मोबाइल एसएमएसमध्ये अशीच भाषा वापरली जाते. वाचणार्‍याला आपल्या आकलनाप्रमाणे समजून घ्यावी लागते. - संदीप दोंड, विद्यार्थी, एचपीटी महाविद्यालय